Home /News /news /

पंतप्रधान मंत्र्यानाही विचारत नाही, स्वतःच्या मनात येईल तेच करतात - राहुल गांधी

पंतप्रधान मंत्र्यानाही विचारत नाही, स्वतःच्या मनात येईल तेच करतात - राहुल गांधी

rAHUL IN BHIWANDI

21 नोव्हेंबर :  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यानाच विचारत नाही. जे स्वतःच्या मनात येईल तेच करतात असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी य़ांनी केला आहे. पंतप्रधान बुलेट ट्रेनवर भाषण देतात, पण रेल्वे रुळांची देखभाल दुरुस्ती आणि सुरक्षेवर काहीच बोलत नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (सोमवारी) संसदेच्या आवारात पत्रकारांशी संवाद साधला. सोमवारी पहाटे राहुल गांधी यांनी दिल्लीतील एटीएम आणि बँकेबाहेर थांबलेल्या लोकांशी संवाद साधला होता. या दौ-याची माहिती देताना राहुल गांधी म्हणाले, मी जिथे गेलो आणि लोकांशी चर्चा केली. यातून एकच दिसले की सर्वसामान्यांना त्रास होत आहे. लोक रांगेत थांबली आहेत, पण बँकेची कर्मचारी मागच्या दारातून मोजक्या लोकांनाच पैसे देत आहेत असा गंभीर आरोप त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या मंत्र्यांनाच विचारत नाही. मग त्यांना आता संसदेत येण्याची गरज काय ?, ते तर सध्या दुस-याच जगात वावरत आहेत अशी टीका त्यांनी केली. पंतप्रधानांची जी 15-20 लोक आहेत त्यांचीच तिजोरी भरणार,त्यांचेच बँकेचे कर्ज माफ होतील. त्यामुळे जे गरीब रांगेत उभे आहेत त्यांचे नुकसान होईल असे गांधींनी म्हटले आहे. पंतप्रधानांचे नवीन रुप आले आहे, त्यांना सुपर प्राईम मिनिस्टर पण म्हणता येणार नाही. त्यांची व्याख्या सांगणे कठीणच आहे असा टोलाही त्यांनी लगावला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


First published:

Tags: Parliament session, Rahul gandhi, Winter session, राहुल गांधी

पुढील बातम्या