Home /News /news /

पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौर्‍यावर रवाना

पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौर्‍यावर रवाना

modi ijn china visit 4413 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (बुधवारी) चीनच्या तीन दिवसांच्या दौर्‍यावर रवाना झाले आहे. पंतप्रधान या तीन दिवसांच्या दौर्‍यात चीन, मंगोलिया आणि दक्षिण कोरियाला मोदी या दौर्‍यामध्ये भेट देणार आहेत. चीनच्या दौर्‍यात व्यापारविषयक तब्बल 20 करार होण्याची शक्यता आहे.

अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या सीमावादावर मात्र कुठल्याही मोठ्या निर्णयाची अपेक्षा नाही. सीमाप्रश्न मार्गी लागावा, अशी अपेक्षा गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली होती. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये होणार्‍या चर्चेत हा विषय येईल. पण, एका रात्रीत त्यावर तोडगा निघू शकत नाही, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय. याशिवाय स्टेपल्ड व्हिसा आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीन उभारत असलेल्या पायाभूत सुविधा या विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमध्ये हवाई वाहतूक वाढवण्यावरही भर असेल. याशिवाय प्रांत, शहरं, कौशल्यविकास, आपत्तीव्यवस्थापन, स्मार्ट सिटीज, पर्यटन, खनिज आणि अंतराळ या क्षेत्रांमध्ये सहकार्यावर करार होऊ शकतात.

'भारत-चीनच्या मैत्रीचा आशियाला फायदा होईल'

चीन दौर्‍यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी चिनी पत्रकारांशी बातचीत केली. हे शतक युद्धाचं नाही, भारत आणि चीनच्या मैत्रीमुळे संपूर्ण आशियाला फायदा होईल, असा विश्वास यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केला. चीनचे राष्ट्रपती शी जिंनपिंग विमानतळावर स्वतः मला घ्यायला येणार आहेत, त्यामुळे मला सन्मानित वाटतंय, असंही ते म्हणाले. या भेटीमुळे दोन्ही देशांमध्ये विश्वास वाढेल, असंही मोदी म्हणाले. दोन्ही देशांमध्ये आर्थिक सहकार्य कसं वाढेल आणि भारताच्या आर्थिक विकासात चीनचा सहभाग कसा वाढेल, यावर माझा भर असेल. भारत-चीन संबंध या शतकातले सर्वात महत्त्वपूर्ण असतील, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: China, PM narendra modi, चीन, नरेंद्र मोदी, मेक इन इंडिया

पुढील बातम्या