मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

पंतप्रधानांच्या भाषणातील ठळक मुद्दे

पंतप्रधानांच्या भाषणातील ठळक मुद्दे

pm speech in loksabha27 फेब्रुवारी : भूसंपादन विधेयकावरून लोकसभेत पेटलेल्या राड्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तडाखेबाज भाषण करून विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं. नुसतं उत्तर दिलं नाहीतर देशाच्या विकासासाठी एकत्र या 'सबका साथ, सबका विकास' हव्याय यासाठी तुम्हीही साथ द्या अशी मित्रत्वाची हाकही दिली. दीड तास चाललेल्या भाषणात फक्त मोदी आणि मोदीचं बोलत होते...लोकसभेच्या प्रचारसभा नंतर पहिल्यांदाच लोकसभेच्या सभागृहात मोदींचं तडाखेबाज भाषण झालं. पंतप्रधानांनी विरोधकांना सडेतोड उत्तर देऊन निरुत्तर केलं. त्यांच्या भाषणातील ही ठळक मुद्दे...सविस्तर बातमी लवकरच

भाषणाचा शेवटला विरोधकांच्या गदारोळामुळे पंतप्रधान म्हणाले, शटऍप !

- माझ्या सरकारचा एकच धर्म इंडिया फस्ट -पंतप्रधान

- माझ्या सरकारचा एकच धर्म देशाची राज्यघटना -पंतप्रधान

- माझ्या सरकारचा एकच धर्म इंडिया फस्ट -पंतप्रधान

- आता हिंदू-मुस्लीम लढाई खूप झाली, आता गरीबीविरोधता लढाईची गरज आहे - पंतप्रधान

- भूसंपादन कायद्यातील काही बाबी शेतकर्‍यांविरोधात असतील, तर त्यामध्ये आम्ही बदल करायला तयार आहोत - पंतप्रधान

- चुका दुरुस्त न करण्याइतपत आम्ही अंहकारी नाही - पंतप्रधान

- देशाला समृद्ध बनवण्यासाठी राज्यांना समृद्ध करा -पंतप्रधान

- खनिजपट्टा असलेल्या पूर्व विभागाला खनिजाच्या लिलावाचा पैसा जाईल -पंतप्रधान

- राज्यांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवतोय -पंतप्रधान

- देशाच्या विकासासाठी सरकारला मदत करा, पंतप्रधानांचं विरोधकांना आवाहन

- शेतकर्‍यांविरोधात एकही गोष्ट असेल तर ती दुरूस्त करण्याची आमची तयारी -पंतप्रधान

- तुम्ही जे केलं ते 'सर आँखो पर' -पंतप्रधान

- कायदा बनल्यानंतर ज्यांनी आधी कायदा बनवला होतं त्यांनाच मी श्रेय देईन -पंतप्रधान

- आधीच्या सरकारनं जे केलंय त्यात सुधारणा करत आहोत-पंतप्रधान

- त्याला सर्व पक्षांनी साथ द्यावी हीच अपेक्षा -पंतप्रधान

- भूसंपादन कायद्याच्या विरोधावर पंतप्रधानांचं उत्तर -पंतप्रधान

- सर्व पक्षाच्या, सर्व मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांकडे लक्ष देण्याचा तगादा लावलाय -पंतप्रधान

- यूपीएच्या भूसंपादन विधेयकाला आम्हीही पाठिंबा दिला होता -पंतप्रधान

- 1894 बनवलेला कायदा बदलायला इतकी वर्ष का लागली ? -पंतप्रधान

- आपत्तींमध्ये शेतकर्‍यांच्या, नुकसानग्रस्तांच्या बाजूनं सरकार उभं राहिलं -पंतप्रधान

- आपत्तींमध्ये आम्ही तू-तू मैं-मैं करत बसलो नाही -पंतप्रधान

- आतापर्यंत 60 ते 65 टॉयलेट्स बांधण्याचं काम झालंय -पंतप्रधान

- हे जनधन योजनेचं यश म्हणावं लागेल -पंतप्रधान

- अनेक खासदारांनी या योजनेला आपला निधी दिलाय

- मनरेगा योजना कधी बंद होणार नाही -पंतप्रधान

- माझ्यावर टीका करण्याशिवाय विरोधकांकडे कुठले मुद्दे नाहीत? -पंतप्रधान

- लाल फितीत अडकलेला राज्यकारभारापासून सर्वसामान्यांची सुटका करायचीये -पंतप्रधान

- समस्या सोडवण्याची सरकारची इच्छाशक्ती आहे आणि प्रयत्नही सुरू आहेत -पंतप्रधान

- सुप्रीम कोर्टाने सांगूनही काळ्या पैशाबाबत एसआयटी बनवली नव्हती ती आम्ही पहिल्याच बैठकीमध्ये स्थापन केली-पंतप्रधान

- काँग्रेसच्या काळात झिरो थेअरी सुरू होती -पंतप्रधान

- कोळसा घोटाळ्याच्या लिलावात कॅगनं विचार केल्यापेक्षा जास्त पैसा आता येतोय पण त्यावेळी त्यात भ्रष्टाचार झाला -पंतप्रधान

- पण त्यावेळी त्यात भ्रष्टाचार झाला -पंतप्रधान

- भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था तयार करायला हवी -पंतप्रधान

- शेतकर्‍यांचा आपण कधी विचार केलाय

- शेतात युरीया टाकून शेतीचा कस घालवलाय

- जमीन परिक्षण केंद्र उभारण्याचा कधी कुणी विचार केला नाही

- देशातल्या जमीनींच परिक्षण होणं आवश्यक आहे

काँग्रेसची टीका

मोदींना वक्तृत्वाची कला चांगलीच अवगत - खरगे

मनरेगासारख्या गरिबांसाठी राबवलेल्या योजनांची पंतप्रधानांनी खिल्ली उडवली -खरगे

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

[if0] Follow @ibnlokmattv[sc0]

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Narendra modi, PM narendra modi, भूसंपादन विधेयक