09 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवरुन सुरू असलेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि अर्थमंत्री अरुण जेटली मैदानात उतरले. पंतप्रधानांच्या पदवी वैध असल्याचा खुलासा अमित शहा आणि जेटली यांनी पत्रकार परिषद घेऊन केलाय.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांच्या पदवीवर आक्षेप घेतला होता. सोशल मीडियावरून पंतप्रधानांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत त्यांनी संशय व्यक्त केला होता. पंतप्रधानांनी दिल्ली विद्यापीठातून बीए आणि गुजरात विद्यापीठातून एमएची पदवी घेतली. आम्हाला पंतप्रधानांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल स्पष्टीकरण द्यावं लागणं हे दुदैर्वी आहे. केजरीवाल यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी अमित शहा आणि जेटली यांनी केली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
Follow @ibnlokmattv
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: AAP, BJP, अमित शहा, अरविंद केजरीवाल, अरुण जेटली