मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

नेपाळमध्ये आता समस्यांचा महापूर

नेपाळमध्ये आता समस्यांचा महापूर

nepal 3rd day27 एप्रिल : नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपानंतर आता हादरे कमी झालेत, पण तिथे आता इतर समस्या निर्माण झाल्या आहेत. जसं की रुग्णालयं.. रुग्णालयं आहेत, नाही असं नाही...पण त्या इमारतींमध्ये रुग्ण थांबायला तयार नाहीत. पुन्हा भूकंप आला तर काय, अशी भीती त्यांच्या मनात आहे म्हणून आता नाईलाज म्हणून रस्त्यांवर तात्पुरती रुग्णालयं उभारायला सुरुवात झालीये.

ऑपरेशन सोडलं, तर इथं सर्व प्रकारचे इलाज सुरू आहेत. पण ऊन, थंडी आणि स्वच्छतेचं काय, हा मोठा प्रश्न आहे. पण भूकंपाचा मानसिक धक्का एवढा आहे, की विवेकबुद्धी वापरण्यास कुणी तयार नाही. दुसरी समस्या म्हणजे पाणी...अनेक ठिकाणी पाईपलाईन्स फुटल्यात..त्यांची डागडुजी करण्यासाठी आणि पाणी वितरण यंत्रणेवर लक्ष ठेवण्यासाठी लोक पुरेसे नाहीयेत. कारण, सगळेच भूकंपातून सावरतायत, कुणाच्या घरी जखमी लोक आहेत. त्यामुळे आता टँकरचा सहारा घेण्याशिवाय पर्याय नाही. टँकरसाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. रांगा लावूनही पुरेसं पाणी मिळतं असं नाही. पण नेपाळच्या नागरिकांपुढे आता पर्याय नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

[if0] Follow @ibnlokmattv[sc0]

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Nepal, नेपाळ, भूकंप, भूकंपाचा हादरा