मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

नेपाळमधून 1,935 भारतीय सुखरूप परतले

नेपाळमधून 1,935 भारतीय सुखरूप परतले

nepal_earthquake

27 एप्रिल : भूंकपाने उद्‌ध्वस्त झालेल्या नेपाळच्या काठमांडू आणि इतर भागांत अडकलेल्या 1935 भारतीय आज (सोमवारी) सकाळ सुखरूप मायदेशी परतले असून आजही नागरिकांच्या सुटकेसाठी विमाने पाठवण्यात येणार आहेत. तसंच पोखरा ते रक्सोल आणि काठमांडू ते गोरखपूर अशा विशेष बससेवाही सुरू करण्यात आले आहेत. नेपाळमध्ये मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांचा नेमका आकडा उपलब्ध नाही असं स्पष्टीकरण भारत सरकारने दिलं आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 291 भारतीयांना घेऊन हवाईदलाचे सी-17 हे विमान दिल्ली विमानतळावर दाखल झाले. आतापर्यंत नेपाळमधून 1935 नागरिकांना सुखरुपरित्या भारतात आणण्यात आले आहे. आजही बचावकार्य सुरूच राहणार आहे. तर पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत मदतकार्याचा आढावा घेतला असून भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 6 लाखांची मदत जाहीर केली आहे.

याबरोबच नेपाळमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालीये त्यामुळे भारतातून नेपाळकडे बचावकार्यासाठी रवाना झालेली हवाई दलाची विमानं परतली आहेत. भूकंप झाल्यानंतर काही तासांच्या आत नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर बचावकार्य करण्यासाठी सरसावला आहे. नेपाळमध्ये सुरू असलेल्या या बचावकार्याला 'ऑपरेशन मैत्री' असं नाव देण्यात आलं आहे. आर्मी हॉस्पिटल्सचं साहित्य, इंजीनिअरिंग टीम्स, जीवनावश्यक वस्तू असं घेऊन जाणारी हवाई दलाची 10 विमानं काल पाठवण्यात आली. एनडीआरएफ च्या काही टीम्सही काठमांडूत पोहोचल्यात. MI 17 जातीची 8 हेलिकॉप्टर्स, आणि चार इतर हेलिकॉप्टर्स नेपाळला पाठवण्यात आली आहेत. एअर इंडिया, स्पाईसजेट, इंडिगो एअरलाईन्सनी काठमांडूकडे अतिरिक्त विमानांची सोय केली आहे. बचावासाठीचं साहित्य प्राधान्यानं पाठवण्यावर एअर इंडियाचा भर आहे. एअरटेल आणि बीएसएनएल या कंपन्यांनी नेपाळमधले कॉल रेट्स कमी केले आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून 15 टन औषधांसह 34 जणांचं वैद्यकीय पथकंही रवाना झाले असून वैद्यकीय अधिकार्‍यांची आणखी सहा पथकं आज नेपाळला रवाना होणार आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

[if0] Follow @ibnlokmattv[sc0]

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: #‎earthquake, Kathmandu, Nepal, Nepal earthquake, ऑपरेशन मैत्री, नेपाळ, पर्यटक, पुणे मोमिता शर्मा, भूकंप, भूकंपाचा हादरा