मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

नेपाळमधील ऐतिहासिक धरहरा टॉवर जमीनदोस्त

नेपाळमधील ऐतिहासिक धरहरा टॉवर जमीनदोस्त

darhara25 एप्रिल : देवभूमी नेपाळ भूकंपाच्या धक्क्यानं हादलाय. या महाप्रलयात 19 व्या शतकातील ऐतिहासिक धरहरा टॉवर जमीनदोस्त झालाय. संपूर्ण नेपाळमध्ये सर्वत्र पडलेल्या इमारती आणि ढिगाचा खच जमा झालाय. ढिगाराखाली दबलेल्या नागरीकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.

नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये ऐतिहासिक धरहरा टॉवर कोसळल्याची बातमी आलीये. टिवट्‌रवर या धरहरा टॉवर नेस्तनाबूत झाल्याचा फोटो पोस्ट करण्यात आलाय. टॉवरच्या ढिगाराखाली शेकडो लोक अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. 1832 मध्ये नेपाळचे प्रथम पंतप्रधान भीमसेन थापा यांनी हा टॉवर उभारला होता.

हा टॉवर अत्यंत प्रतिष्ठित स्मारक होतं. सैन्य या टॉवरचा उपयोग टेहाळणीसाठी करत असतं. त्यानंतर हा टॉवर काठमांडूमध्ये एक ऐतिहासिक वास्तू बनली. टॉवर कोसळल्यामुळे नेपाळच्या नागरीकांच्या दुखात आणखी भर पडली असून शेकडो नागरीक टॉवरखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

[if0] Follow @ibnlokmattv[sc0]

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Nepal, दिल्ली, नेपाळ, भूकंप, भूकंपाचा हादरा