विवेक कुलकर्णी,मुंबई 11 एप्रिल : यावेळेसच्या निवडणुकीत प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय. यापूर्वी सोशल मीडियाची टिंगलटवाळी करणार्या नेत्यांनीही आता स्वत:चं ट्वीटर अकाउंट सुरु केलंय. पक्षांनी स्वत:च्या वेबसाईट, फेसबुक आणि ट्विटर अकाऊंट सुरु केलंय.
देशातल्या लोकसंख्येत तरुणांची संख्या मोठी आहे. यातील अनेकजण यावेळी पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. या तरुणावर्गात सोशल मीडिया अतिशय लोकप्रिय आहे. आणि हेच लक्षात घेऊन राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार पारंपारिक प्रचाराच्या पद्धतीसोबतच सोशल मीडियाद्वारे मोठ्या प्रमाणात प्रचार करताना दिसतायत. फेसबुक, ट्वीटर, व्हॉट्सऍप, ईमेल, ब्लॉग यांच्यामार्फत राजकीय पक्ष आपले पदाधिकारी, मतदार, राजकीय विश्लेषक, पत्रकार यांच्यापर्यंत विविध विषयांबद्दलची आपली भूमिका पोहचवतायत. सोशल मीडीयाद्वारे प्रचार करण्यात भारतीय जनता पक्षानं इतर पक्षांवर आघाडी घेतलीयं. भाजप आयटी सेलभाजपशिवाय आम आदमी पक्षानही सोशल मीडियाद्वारे आपला प्रचार करण्यावर भर दिलाय. सोशल मीडियाद्वारे चटकन निरोप पोहचवता येत असल्यामुळे आप च्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडिया विशेष लोकप्रिय आहे. राष्ट्रस्तरीय, राज्यस्तरीय एव्हढच नाही तर आपच्या उमेदवारांनी मतदारसंघनिहाय ट्विटर आणि फेसबक अकाऊंट सुरू केलय.
सोशल मीडियाद्वारे प्रचार करणार्या उमेदवारांना आणि पक्षांना प्रत्यक्ष मतांचा किती फायदा होतो हे येत्या 16 मेलाच कळेल.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: AAP, BJP, Congress, Election, Facebook, MNS, भाजप, सोशल मीडिया