Home /News /news /

निवडणुकीच्या रणधुमाळीतही प्रेमाला नाही तोटा, सात जोड्या प्रचाराला !

निवडणुकीच्या रणधुमाळीतही प्रेमाला नाही तोटा, सात जोड्या प्रचाराला !

वैभव सोनवणे आणि गोविंद वाकडे,पुणे

14 फेब्रुवारी : सध्या निवडणुकीचं वारं वाहत असतानाच तरुणाईत व्हॅलेंटाईन डे चा उत्साहही जोरात आहे. यंदा निवडणुकीच्या आखाड्यात पुण्यात तब्बल ७ पती पत्नी जोडीने आपला नशीब निवडणुकीत अजमावत आहेत. त्यामुळे या उमेदवार पतिपत्नीचा व्हॅलेंटाईन प्रचार करतानाच साजरा होतोय.

व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा उत्सव...आणि निवडणुकीच्या धामधुमीत त्याचा वेगळा आविष्कार दिसतोय. निवडणुकीच्या या धामधुमीत उमेदवार असलेले पतिपत्नी प्रचार करता करताच  व्हॅलेंटाईन साजरा करताहेत. कोरेगावपार्क ढोले पाटील प्रभागातील मनसेचे उमेदवार बाबू वागस्कर आणि वनिता वागस्कर ही पतीपत्नींनी जोडी झपाटून प्रचार करतायत आजच्या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रभागातल्या वाडिया कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत स्वतःचा प्रचार ही करत आहेत. महत्वाचं म्हणजे प्रचारामुळे का होईना दोघांना सोबत वेळ घालवता येतोय. त्यामुळे ही जोडगोळी प्रचंड आनंदात आहे.

pune_cadinetज्या शिवसेनेला एकेकाळी व्हॅलेंटाईन चा तिटकारा होता त्यांना ही निवडणुकीच्या तोंडावर तरुणांना नाराज करायचा नाही. त्यामुळे आता त्यांचा ही व्हॅलेंटाईन डे चा विरोध मावळालंय. त्यामुळे ताडीवाला रोड प्रभागतले शिवसेनेचे पती पत्नी उमेदवार प्रचार करत त्यांचा पहिला व्हॅलेंटाईन साजरा करताहेत.

यामध्ये अपक्षही मागे नाहीत, व्हॅलेंटाईन डेचा फायदा घेत पिंपरी चिंचवडमधले अपक्ष उमेदवार प्रशांत शितोळे यांनी मतदारांना गुलाबाची फुलं देत व्हॅलेंटाईनचा प्रचारातही वापर केला. प्रचाराच्या निमित्तानं जोडीदारासोबत वेळ घालावायची संधी आणि मतदारांना खूश करण्याचा एकत्र प्रयत्न करताय.

व्हॅलेंटाईन डे पाश्चिमात्य म्हणत म्हणत आता सगळ्याच विचाराच्या संघटनानॆ जवळपास मान्य केलाय. राजकीय अपरिहार्यतेमुळे आता निवडणुकीच्या काळातला व्हॅलेंटाईन बिनबोभाट आणि कुणाच्याही विरोधाशिवाय साजरा होतोय. त्यामुळे मतदारांसोबत उमेदवारही आनंदाने व्हॅलेंटाईन साजरा करताहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: NCP, Pune, Pune election, पुणे

पुढील बातम्या