मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'निर्भया'वर बलात्कार करणारा अल्पवयीन आरोपी रविवारी सुटणार

'निर्भया'वर बलात्कार करणारा अल्पवयीन आरोपी रविवारी सुटणार

49175530

18 डिसेंबर :  दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला आज (शुक्रवारी) दिल्ली हायकोर्टाने दिलासा दिला आहे. संपूर्ण देशाला हादरवून टाकलेल्या या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची येत्या रविवारी म्हणजे 20 डिसेंबरला सुटका होण्याच्या निर्णयावर हायकोर्टाने शिक्कामोर्तब केलं आहे.

याप्रकरणातील अल्पवयीन आरोपीची सुटका होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यात हस्तक्षेप करण्यास कोर्टानं नकार दिला आहे. त्यामुळे अल्पवयीन गुन्हेगाराच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. अल्पवयीन गुन्हेगारांसाठीच्या निर्धारित कायद्यानुसार गुन्हेगारने या प्रकरणी सर्वाधिक तीन वर्षांची शिक्षा भोगली आहे. त्यामुळे 20 डिसेंबरनंतर त्याला सुधारगृहात ठेवता येणार नाही, असे कोर्टोने स्पष्ट केलं आहे. पण हा दोषी पूर्णपणे मोकळा नसेल. जुव्हेनाईल जस्टीस बोर्डाची एक समिती त्याच्यावर नजर ठेवेल, आणि तो समाजात वावरायला योग्य आहे का, हे ठरवेल, असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, दिल्ली हायकोर्टाच्या या निर्णयानंतर निर्भयाच्या आईनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दिल्ली हायकोर्टानं नेमकं काय म्हटलंय?

- जुव्हेनाईल जस्टीस कायद्याअंतर्गत दोषीला सुधारगृहात जास्तीत जास्त 3 वर्षं ठेवता येतं - येत्या 20 तारखेला दोषीला सुधारगृहात 3 वर्षं पूर्ण होतील - म्हणून, त्याला यापुढेही सुधारगृहात ठेवण्याचा कोणताही आदेश देता येणार नाही - याच कारणामुळे आम्ही कोणताही निर्देश देण्यास नकार देतो.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Nirbhaya gang rape case, निर्भया बलात्कार प्रकरण

पुढील बातम्या