10 नोव्हेंबर : बिहारमध्ये विजयरथ खेचून आणणारे नितीशकुमार आता बिहारचे मुख्यमंत्री म्हणून 20 नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत अशी माहिती सूत्रांनी आयबीएन नेटवर्कला दिली आहे.
भाजपला धुळ चारत नितीशकुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्या महाआघाडीने सर्वाधिक 278 जागा जिंकण्याचा भीम पराक्रम गाजवला. बिहारमधल्या विजयानंतर 10 दिवसांनंतर सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येईल असं लालूंनी अगोदरच जाहीर केलं.
तसंच नितीशकुमारच मुख्यमंत्री होतील असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. आता दिवाळीच्या धामधुमीनंतर सरकार स्थापन आणि नितीशकुमार यांचा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी होणार आहे. त्यांच्यासोबत मंत्रिमंडळाचा विस्तार ही होईल. पण, खातेपाटपाची प्रक्रिया अजूनही गुलदस्त्यात आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.