25 फेब्रुवारी : बिहारमध्ये सोमवारी जोरदार राजकीय नाट्य घडले. 'आपल्या पार्टीत झालेल्या बंडखोरीमागे नितीश कुमार' असल्याचा आरोप आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी केला आहे. लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडीच्या 22 पैकी 13 आमदारांनी आपण पार्टीशी फारकत घेत असल्याचं जाहीर केलं होतं. मुख्यमंत्री नितीशकुमार सरकारला पाठिंब्याची घोषणाही त्यांनी केली. विधानसभा अध्यक्षांनीही त्यांना वेगळा गट म्हणून मान्यता दिली. परंतु रात्र होताच 6 आमदार
त्यानंतर त्यातल्या 6 आमदारांनी आपल्या खोट्या सह्या करण्यात आल्याचा दावा करत पक्षात परतले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यातले आणखीन 3 आमदार आरजेडीमध्ये परतण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आपण आपले सगळे 22 आमदार आज पत्रकारांच्या समोर हजाार करू असं ल्लू प्रसाद यादव यांनी जाहीर केलेलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fodder scam, Laluprasad yadav, Relief to lalu, RJD, Supreme court verdict on lalu