Home /News /news /

नाट्यपरिषदेत धुसफूस नाट्य, उदय सामंतांनी दिला राजीनामा

नाट्यपरिषदेत धुसफूस नाट्य, उदय सामंतांनी दिला राजीनामा

uday samant20 एप्रिल : नाट्यपरिषदेच्या नियामक मंडळातला वाद उफाळून आला असून नियामक मंडळाचे सदस्य आमदार उदय सामंत यांनी राजीनामा दिलाय. राजकीय व्यस्ततेमुळे राजीनामा दिल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय. मात्र,यामागे मोहन जोशी आणि उदय सामंत यांच्यातील वाद कारणीभूत असल्याचं बोललं जातंय. मोहन जोशी आणि उदय सामंत यांच्यात बेळगाव नाट्य संमेलनापासून वाद सुरू होते. बेळगाव नाट्यसंमेलनात संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडण्यावरून या दोघांमध्ये ठिणगी पडली होती. उद्धव ठाकरेंचं त्यावेळी पत्रिकेत नाव छापलं पण त्यांना बोलावणे आले नाही यावरूनही दोघांमध्ये खडाजंगी झाली होती. समारोपाच्या कार्यक्रमात दिवाकर रावतेंनीही याप्रकरणी नाट्यपरिषदेचे कान उपटले होते. मोहन जोशींच्या बेताल वक्तव्यांचाही आमदार उदय सामंत यांनी त्यावेळीही जाहीर विरोध करत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर उदय सामंत विरूद्ध मोहन जोशी असे दोन गट पडले होते. या दोघांच्या वादाचे पडसाद आता उमटू लागले आहेत. आमदार उदय सामंत यांनी नाट्यपरिषद नियामक मंडळाचा राजीनामा दिल्यानंतर इतर सदस्य कुणाच्या बाजूने जातायत याकडे आता लक्ष लागलंय. एकूणच हा वाद चांगलाच रंगणार असल्याचं दिसतंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: उदय सामंत

पुढील बातम्या