16 जून : एककीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली तर दुसरीकडे पक्षातील कार्यकर्ते वरीष्ठ नेत्यांच्या जाचाला कंटाळून पक्षाला सोडचिट्टी देत आहे.
राष्ट्रवादीच्या माजी आमदार मंदा म्हात्रे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. राज्याचे उत्पादनशुल्क मंत्री आणि नवी मुंबईचे आमदार गणेश नाईक यांच्या जाचाला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचं मंदा म्हात्रे यांनी सांगितलंय.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्याकडे म्हात्रे यांनी राजीनामा सोपवलाय. काही दिवसांपूर्वी नाईक आणि म्हात्रे यांच्यामध्ये बाचाबाचीही झाली होती. त्यामुळे नाराज म्हात्रे यांनी पक्षत्याग करुन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ganesh naik, Manda mhatre, Navi mumbai