23 एप्रिल : नवीमुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी मोर्चेबांधणी सुरू केलीये. गणेश नाईक यांनी आपला गड राखण्यासाठी 5 अपक्षांची मदत घेणार असल्याचं कळतंय.
आतापर्यंत हाती आलेल्या निकालात राष्ट्रवादीने 51 जागांवर आघाडी मिळवलीये. बहुमतासाठी 56 जागांची गरज आहे. नाईक यांनी अपक्षांची मदत घेण्याचा निर्णय घेतलाय.
तर दुसरीकडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांनी राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्याचे संकेत दिले आहे. पक्षाने आदेश दिले तर राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करू अशी माहिती भगत यांनी दिली.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress, NCP, गणेश नाईक, राष्ट्रवादी