नवी मुंबई - 19 मार्च : राज्यात पाणी टंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस भीषण रूप धारण करत आहे. नवीमुंबईत तर पाणीबाणी लागू झाली असून लोकं चक्क पाणी चोरी करत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे लोकांनी ड्रम्स आणि पाण्यांच्या टाक्यांना लॉक लावून ठेवलंयय
नवी मुंबई महापालिकेने सद्या 32 टक्के पाणीकपात जाहीर केलीये. त्यामुळे आता शहरात फक्त 3 तासचं पाणीपुरवठा केला जाणार आहे. मोरबे धरणातील शिल्लक असलेलासाठी जुलैपर्यंत पुरावा यासाठी ही पाणीकपात केली गेलीये. त्यामुळं लोकांनी आता पाणी साठवायला सुरवात केलीये. ड्रम विकत आणून ते दरवाजात पाणी भरून ठेवले जाताय. पण, हे पाणी चोरीला जात असल्याचं समोर आलंय. म्हणूनच रहिवाशांनी आता पाणी भरून ठेवलेल्या ड्रमला टाळे लावण्यास सुरवात केलीये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.