मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /नवी मुंबईत नाईकाच किंग, विरोधकांना धोबीपछाड !

नवी मुंबईत नाईकाच किंग, विरोधकांना धोबीपछाड !

    Ganesh naik23 एप्रिल : नवीमुंबईतील राजकारण हे फक्त आणि फक्त गणेश नाईकांच्या नावावरच चालतं हे पुन्हा एकदा सिद्धा झालं. लोकसभेत आणि विधानसभेत हार पत्कारल्यानंतर गणेश नाईकांची सत्ता महापालिकेतही उलथवून लावू अशी भीमगर्जना करणारे मंदा म्हात्रे, विजय नाहटा आणि वैभव नाईक हे विरोधक स्वतःच निष्प्रभ ठरल्याने गणेश नाईक अपक्षांना हाताशी धरून सलग पाचव्यांदा महापालिकेत आपली सत्ता स्थापन करतायत. कोण होते गणेश नाईकांचे हे प्रमुख विरोधक आणि त्यांची काय अवस्था झाली ते पाहूया

    पहिला विरोधक - आमदार मंदा म्हात्रे

    गणेश नाईकांना विधानसभेत धूळ चारल्यानंतर मंदा म्हात्रे नवीमुंबईत भाजपच्या तारणहार झाल्या. मात्र, भाजपची संघटना नवीमुंबईत मजबूत करणं तर सोडाच पण अतिआत्मविश्वास आणि समर्थकांना मानाची वागणूक न देण्यामुळे त्या सतत चर्चेत राहिल्या. गेल्या पालिकेत भाजपची फक्त 1 जागा असतानाही यावेळी 111 जागा आपण आपल्या एकट्याच्या जीवावर लढवू असा अट्टहास मंदाताईंनी धरला. पुढे शिवसेनेबरोबर युती करून हट्टाने 44 जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या. आपल्या समर्थकांना तिकीटं दिली खरी पण त्यांना निवडून आणण्यात त्या साफ अपयशी ठरल्या. 44 मधले अवघे 6 उमेदवार निवडून आले आणि तेही स्वता:च्या बळावर.

    दुसरा विरोधक - विजय नाहटा

    नवीमुंबई आयुक्तपदाची धुरा सांभाळणार्‍या विजय नाहटांनी विधानसभेपूर्वी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आणि गणेश नाईकांना विधानसभेत जोरदार टक्कर दिली. हे करत असताना त्यांनी दुसर्‍या विजयला शिवसेनेतून साईडट्रॅक केलं. 'मातोश्री'चा विश्वास आणि पालकमंत्री एकनाथ शिंदेंची साथ यामुळे विजय नाहटा यांना नवीमुंबई शिवसेनेत बरेच महत्व मिळू लागले. तिकीट वाटपाच्यावेळीही विजय चौगुलेंना बाजूला सारत स्वता:च्या समर्थकांना तिकीटं देण्यात आली. बेलापूर विधानसभेची जबाबदारी असलेल्या या शिवसेना उपनेत्याला आपल्या पट्‌ट्यात ना राष्ट्रवादीला लगाम घालता आला ना काँग्रेसला.

    तिसरा विरोधक - वैभव नाईक

    गणेश नाईकांचा पुतण्या असला तरी वैभव सतत राष्ट्रवादी आणि गणेश नाईकांच्या विरोधात राहिला. विधानसभेत ऐरोलीतून शिवसेनेची उमेदवारी न मिळाल्याने भाजपच्या कमळाचा आधाार घेत त्याने निवडणूक लढवली. तरूण रक्त आणि 21 व्या शतकातील शहरातील असणारा तरूणांचा पाठिंबा यामुळे वैभव नाईकांची ताकद तर वाढली पण आमदार मंदा म्हात्रेंची असलेले वाद आणि कोणताही मुद्दा नसताना गणेश नाईकांवरची टीका त्यांना भोवली. यामुळे त्यांची सख्खी बहिणच राष्ट्रवादीच्या तिकीटावर वैभव नाईकांच्या बायकोसमोर उभी राहिली आणि निवडूनही आली, आपली घरची जागा न सांभाळू शकणारे वैभव नाईक आपल्या समर्थकांनाही निवडून आणण्यात अपयशी ठरले.

    चौथे विरोधक - विजय चौगुले

    गणेश नाईकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणार्‍या विजय चौगुलेंची लाट काही महिन्यांपासून ओसरली होती. लोकसभा,विधानसभेत हार मिळाल्यानंतर विजय चौगुलेंचं शिवसेनेतून महत्त्व कमी झालं. मात्र पालिका निवडणुकीत ऐरोलीची जबाबदारी असणार्‍या चौगुलेंनी स्वता: मैदानात उतरून आपला मुलगा,जावई आणि अनेक समर्थकांना निवडून आणलं आणि गणेश नाईकांना जोरदार टक्कर दिली. जनतेने दाखवलेला विजय चौगुलेंवरचा विश्वास जर पक्षाने दाखवला असता तर चित्र वेगळं दिसलं असतं.

    दोन निवडणूका हरल्यानंतर गणेश नाईकांना आपल्या म्हण्याप्रमाणे घरातून एकालाही उमेदवारी दिली नाही, विरोधकांचा अतिआत्मविश्वास गणेश नाईकांच्या उलटा मदतीलाच आला. अपक्षांची कास धरत गणेश नाईक जरी सत्ता आणत असले. तरी सलग पाचव्यांदा सत्ता पालिकेत आल्याने नवीमुंबईकरही दबक्या आवाजात म्हणायला लागलेत राजाचं राजपण आजपण उद्यापण...

    ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    [if0] Follow @ibnlokmattv[sc0]

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    First published:

    Tags: Congress, NCP, गणेश नाईक, राष्ट्रवादी