Home /News /news /

राष्ट्रवादीत यादवी, नवाब मलिकांवर संजय दिना पाटलांचा हल्ला

राष्ट्रवादीत यादवी, नवाब मलिकांवर संजय दिना पाटलांचा हल्ला

sanjay_dina_patil429 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यादवी माजली असल्याचं चित्र निर्माण झालंय. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर राष्ट्रवादीचे माजी खासदार संजय दिना पाटील यांनी हल्ला केलाय. आज संध्याकाळी देवनार येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याचे प्रवक्ते नवाब मलिक संबोधित करणार होते त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी खासदार संजय पाटील आपल्या30 ते 40 गुंडासोबत तलवारी आणि बंदूक घेऊन आले. नवाब मलिक यांच्यासोबत शाब्दिक चकमक झाली त्यानंतर मारहाण करण्यात आली. यात 5 ते 8 लोक जखमी झाली. नवाब मलिक यांनी आरोप केली की, 5 वाजता संजय पाटील यांनी फोनवरून सभेला न जाण्याची धमकी दिली होती. याबाबत मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांना याची माहिती दिली होती. सभेमध्ये माझ्यावर गोळीबार करण्यात आला.असा आरोप नवाब मलिक यांनी केला. पण सुदैवानं मला किंवा इतर कोणत्याही कार्यकर्त्याला गोळी लागली नाही. पण त्यांच्या तलवारधारी लोकांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये आमचे कार्यकर्ते जखमी झाले आहेत. या शस्त्रधारी लोकांसोबत संजय दिना पाटील होते. त्यांच्या हातातही दोन बंदुका होत्या. त्यांनीही माझ्यावर फायरिंग करण्याचा प्रयत्न केला. पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दाखल केली आहे असं नवाब मलिक यांनी सांगितलं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: NCP, नवाब मलिक, राष्ट्रवादी

पुढील बातम्या