मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

नगरसेवकांनी महासभेतच मारला कबाब-बिर्याणीवर ताव

नगरसेवकांनी महासभेतच मारला कबाब-बिर्याणीवर ताव

bhiwandi28 डिसेंबर : भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या नगरसेवक - नगरसेविकांनी मंगळवारी झालेल्या महासभेत विकास कामांच्या मुद्यांना महत्व न देता, नागरीकांनीच दिलेल्या टॅक्सच्या पैशावर चक्क बिर्याणी आणि चिकन कबाबवर मनमुरादपणे  ताव मारून आपली भूक भागवली. उपस्थित नगरसेवकांनी जशी काही थर्टीफस्र्टची साजरी केली.

१९ डिसेंबरची तहकुब महासभेचे आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रम पत्रिकेवरील विषयांचे मुद्दे चर्चेला येत होतं. यावेळी जेवणाची वेळ झाल्याने  बहुतांश नगरसेवक, नगरसेविकांनी बसल्या जागीच बिर्याणी आणि चिकन कबाबची मागणी करून जेवणाचा आस्वाद घेतला. यावेळी नगरसेवकांमध्ये जणूकाही थर्टीफस्ट साजरा करीत असल्याचे जाणवत होतं.

महासभेत वाहतूक कोंडीला अडथळा ठरणाऱ्या मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण व्हावं यासाठी पालिका प्रशासनाकडून सूचना मांडण्यात आली होती. या शहरविकासाच्या ठरावाला स्वार्थी नगरसेवकांनी प्रखर विरोध केला. शहरात अनेक नागरी समस्या असताना त्यावर चर्चा करून नागरीकांना न्याय देण्याऐवजी मटन,बिर्याणीवर ताव मारून ढेकर देण्यात धन्यता मानणाऱ्या नगरसेवकांची शहर विकासासाठी किती तळमळ आहे ते दिसून येत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: नगरसेवक, नगरसेविका, भिवंडी

पुढील बातम्या