मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

धुळ्यात पावसाचा कहर,15 गावांचा संपर्क तुटला

धुळ्यात पावसाचा कहर,15 गावांचा संपर्क तुटला

23 सप्टेंबर : धुळे, जळगाव आणि नंदूरबार या 3 जिल्ह्यांना मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय. या जिल्ह्यांतून जाणार्‍या तापी नदीला पूर आला असून अनेक शेतांमध्ये पाणी शिरलंय. या पावसानं केळी आणि कापसाच्या पीकाचं मोठं नुकसान झालाय. शिरपूर तालुक्यातील खर्दे गावासह तीन गावांचा संपर्क तुटलाय. नंदुरबार जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. नाल्यांना पूर आल्यानं शहादा - बोरद तसंच तळोदा - बोरद हे रस्ते वाहून गेल्यानं जिल्यातील 15 गावांचा सध्या संपर्क तुटलाय. तापीची पाणी पातळी 108 मिटरपर्यंत वाढली आहे. तर नर्मदेची पातळी 126.8 वर गेलीये. त्यामुळे बॅक वॉटर जिल्हयातील विविध गावांत पाणी शिरलंय.

First published:

Tags: Jalgaon, Rain, जळगाव, धुळे, नंदूरबार, पावसाचा कहर, पूर