मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

धार्मिक कार्यक्रमांच्या नावाखाली अधिकारी आणि कार्यकर्त्यांचा नाचगाण्यांचा गोंधळ

धार्मिक कार्यक्रमांच्या नावाखाली अधिकारी आणि कार्यकर्त्यांचा नाचगाण्यांचा गोंधळ

28 जानेवारी :  एकीकडे प्रजासत्ताकदिनी राजपथावरच्या संचलनाच्या निमित्ताने नारी शक्तीचा गौरव करण्यात येत असताना त्याच दिवशी मुंबईतील मीरा रोडमध्ये बीभत्स नृत्याने अनेकांना लाज आणली.

रिपब्लिकन पाटच् ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र शेलेकर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक ठिकाणी देश भक्ति गीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केले गेले होते, पण मीरा रोड येथे चक्क अश्लील डान्सचा प्रकार बघायला मिळाला. या कार्यक्रमाचा बघ्यांनी जरी मनमुराद आनंद घेतला असला तरी रस्त्यावरुन जाणार्‍या महिलांना मात्र यामुळे खाली मान घालून जाण्याची वेळ आली. त्यामुळे आठवले साहेबांचे कार्यकर्ते पक्षाच्या बॅनर खाली संविधानाचा कसा गौरव करत आहेत, असा प्रश्न उपस्थित राहिला आहे.

दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवलीच्या ऑफिसमध्ये मुख्यालयात माघी गणेशोत्सवासाठी पालिका कर्मचार्‍यांनी लावणीचा कार्यक्रम ठेवला होता. ही लावणी सुरू असताना कर्मचारी बेभान झाल आणि त्यांनी लावणी कलाकारांवर नाचत नोटा उधळल्या. तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा शहरात लोकवर्गणीतून भजन संध्येच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, या भजन संध्येत आयोजकांनी गायिकेला लावणी गायला लावली आणि स्टेजवर नाचायला सुरुवात केली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

[if0] Follow @ibnlokmattv[sc0]

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Jalgaon, KDMC, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, जळगाव, डोंबिवली