Home /News /news /

धनदांडग्यांना माफी; शेतकर्‍यांना का नाही - सुशीलकुमार शिंदे

धनदांडग्यांना माफी; शेतकर्‍यांना का नाही - सुशीलकुमार शिंदे

Sushil kumar shinde123

पुणे - 09 मे : सरकार धनदांडग्यांचे हजारो कोटींचे कर्ज माफ होतात. मात्र, गोरगरीब शेतकर्‍यांचे कर्ज माफ करताना आपण आखडता हात का घेतो, असा खडा सवाल माजी केंदीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदेंनी सरकारला विचारला आहे. पुण्यात 'डीएसके फाउंडेशन'ने आयोजित 'डीएसके गप्पां'च्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्यांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यावेळी बोलताना त्यांनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर भाष्य केलं.

 तसंच यावेळी त्यांनी सैराट चित्रपटाच्या निमित्तानं स्वतःच्या आंतरजातीय विवाहाचा किस्साही उलगडला. आंतरजातीय विवाह शौक म्हणून करू नये. त्यात मुलीलाही खूप त्याग करावा लागतो. त्याचा सन्मान ठेवा. विवाह म्हणजे तडजोड, त्याग हे लक्षात ठेवा. लग्न टिकवून ठेवा, असं आवाहन शिंदे यांनी तरुणाईला केलं आहे.

दरम्यान, मोदी सरकारची अजून तीन वर्षे बाकी आहेत. त्यामुळे पुढील पंतप्रधान कोण, याचा निर्णय नंतर घेता येईल. आताच गुडघ्याला बाशिंग नको,' या शब्दांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. त्याचबरोबर पवार यांचे मत वैयक्तिक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: Farmer, Sushilkumar shinde, सुशीलकुमार शिंदे

पुढील बातम्या