09 नोव्हेंबर : देशातील प्रतिष्ठेचा आणि सर्वोच्च असे 2013 चे पद्म पुरस्कार वादात सापडले आहे. या पद्म पुरस्कारांसाठी अनेक व्हीआयपींनी स्वतःच्या नातेवाईक आणि सहकर्यांसाठी शिफारसी केल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकाराखाली उघड झाली आहे.
विशेष म्हणजे एक दोन नव्हे तर अशा प्रकारची 25 नामांकन आल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्या लहान बहीण उषा मंगेशकर यांच्यासाठी शिफारस केल्याची बाबही यात उघड झालीय. तसंच उस्ताद अमजद अली खान यांनी आपल्या दोन मुलांसाठी शिफारस केलीय तर सपाचे नेते अमरसिंह यांनी अभिनेत्री आणि खासदार जयाप्रदा यांच्यासाठी शिफारस केलीय.
नावाजलेल्या दिग्गजांनी शिफारस तर केलीच आहे आणि यात राजकीय नेते मागे कसे राहणार. काँग्रेस नेते मोतिलाल व्होरा, काँग्रेसचे खासदार टी सुब्बरामी रेड्डी आणि पंडित जसराज यांनी डझनभर नावांची शिफारस केली आहे. पुढील वर्षी एप्रिलमध्ये हे पुरस्कार दिले जाणार आहेत. आणि त्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तब्बल 1300 शिफारसी आल्या आहेत.
कुणी कुणाची शिफारस केली
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Award, Padma award, Padma puraskar, Padma puraskar 2013