मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

देशविरोधी घोषणा प्रकरण : उमर आणि अनिर्बन जामिनावर जेलबाहेर

देशविरोधी घोषणा प्रकरण : उमर आणि अनिर्बन जामिनावर जेलबाहेर

umar318 मार्च : देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपावरुन अटकेत असणारे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी उमर खालिद आणि अनिर्बन भट्ट्ाचार्य यांना 6 महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर झालाय. या दोघांची उद्या तिहार जेलमधून मुक्तता करण्यात येईल. या दोघांना जामीन मंजूर झाल्यावर जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. जेएनयूत देशविरोधी घोषणा दिल्याची घटना घडल्यानंतर कन्हैया कुमारसह त्याच्या अन्य पाच सहकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कन्हैया कुमारच्या अटकेनंतर उमर आणि इतर चारजण फरार होते. मागील महिन्यात ते गुपचुप पुन्हा कॅम्पसमध्ये परतले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी पोलिसांना शरण आले होते. खालिद आणि अनिर्बन यांना एका सुरक्षा वाहनातून जेएनयू कॅम्पसच्या बाहेर आणलं गेलं. त्यानंतर ते पोलिसांना शरण आलं. या दोघांवरही देशविरोधी घोषणा केरणे आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आज त्यांची जामिनावर सुटका झालीये.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: Abvp, JNU, Protest, Rajnath singh, अनिर्बन, अभाविप, उमर, जेएनयू

पुढील बातम्या