मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

देशविरोधात घोषणा दिल्या 'असल्यास' म्हणायचं होतं, 'फर्ग्युसन'च्या प्राचार्यांची सारवासारव

देशविरोधात घोषणा दिल्या 'असल्यास' म्हणायचं होतं, 'फर्ग्युसन'च्या प्राचार्यांची सारवासारव

fergusson_collage_pardeshiपुणे - 23 मार्च : फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये काही विद्यार्थी समुहाने देशविरोधी घोषणा दिल्यात. त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी असं पत्र प्राचार्य डॉ.परदेशी यांनी डेक्कन पोलिसांना लिहिलं होतं. पण, आता प्राचार्यांनी या पत्रावरून यू-टर्न घेतलाय. या पत्रात टायपिंग मिस्टेक झाली, देशविरोधी घोषणा दिल्या असल्यास कारवाई करा, त्या पत्रात 'असल्यास' हा शब्द टाईप करायचा राहुन गेला अशी सारवासारव प्राचार्य रवींद्रसिंह परदेशींनी केलीये.

पुण्यातील प्रतिष्ठित फर्ग्युसन कॉलेजमध्ये देशविरोधी घोषणा प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली. खुद्ध प्राचार्य रविंद्रसिंह यांनी डेक्कन पोलिसांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली. "महाविद्यालयामध्ये प्राचार्यांची कोणतीही परवानगी न घेता एकत्र होऊन या विद्यार्थी समुहाने काही देश विरोधी घोषणा दिल्या. महाविद्यालयाच्या आवारामध्ये एकत्र येऊन अशा प्रकारे एकत्र जमून देशविरोधी घोषणा देणार्‍या व्यक्तींवर त्वरित कारवाई करावी" अशा आशयाचं पत्रच प्राचार्य रवींद्रसिंह परदेशींनी पोलिसांना लिहिलं होतं.

त्यांच्या या पत्रामुळे फर्ग्युसन महाविद्यालयात देशविरोधी घोषणाबाजी झाली याला एकाप्रकारे दुजोरा मिळाला. पण, परदेशी यांनी या प्रकरणी सारवासारव केलीये. देशविरोधी घोषणा केल्या 'असल्यास' कारवाई करा असं आम्हाला म्हणायचं होतं. त्या पत्रात 'असल्यास' हा शब्द चूक राहुन गेला अशी सारवासारव परदेशी यांनी केली. या बद्दल नव्याने पत्र लिहिले असून ते पोलिसांना देण्यात आलंय असा खुलासाही परदेशी यांनी केला.

राज्य गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश दरम्यान, फर्ग्युसन कॉलेजमध्ये घोषणाबाजी आणि पत्रामध्ये टायपिंग मिस्टेक प्रकरणी चौकशी समिती नेमणार अशी माहिती राज्याचे राज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली. या प्रकरणाची सखोल चौकशीनंतर ज्यांनी कायद्याचं पालन केलं नसेल अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात येणार आहे असंही राम शिंदे यांनी स्पष्ट केलं. काय आहे प्रकरण फर्ग्युसन कॉलेजमध्ये 'ट्रुथ ऑफ जेएनयू' हे सांगण्यासाठी अभाविपचा नेता आलोक सिंग आला होता. या कार्यक्रमाला कॉलेज प्रशासनाने परवानगी दिली नव्हती तरीही हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम सुरू असतांना आंबेडकरी चळवळीतील काही विद्यार्थी तिथे पोहचले आणि त्यांनी कार्यक्रमाला रितसर परवानगी घेतली का ? अशी विचारणा केली. त्यामुळे अभाविप आणि आंबेडकरी चळवळीतील विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली आणि याला घोषणाबाजीला स्वरुप आलं. "अभाविप चले जाओ", "कितने रोहित मारोगे, घर घर से रोहित निकलेगा" अशा घोषणा आंबेडकरी चळवळीतील विद्यार्थ्यांनी दिल्या. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी वंदे मातरम्‌च्या घोषणा दिल्यात. पोलिसांनी परिस्थिती पाहता अभाविपचा कार्यक्रम बंद केला. पोलिसांनी हस्तेक्षप करून दोन्ही गटाला शांत कऱण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: Abvp, Pune, अभाविप, पुणे

पुढील बातम्या