मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

देशद्रोहाचा आरोप असलेला उमर खालिद ‘जेएनयू’त परतला

देशद्रोहाचा आरोप असलेला उमर खालिद ‘जेएनयू’त परतला

CbxOyMDUYAA8sUL

दिल्ली - 22 फेब्रुवारी : दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात(जेएनयू) देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी देशद्रोहाचा आरोप असलेला उमर खालिद जेएनयू कॅम्पसमध्ये परतला आहे. त्याच्यासोबत आणखी चार विद्यार्थीही कॅम्पसमध्ये दाखल झाले आहेत. उमर खालिदबरोबर शेकडोच्या संख्येने विद्यार्थी सध्या प्रशासन ब्लॉकमध्ये उपस्थित असून उमर आणि त्याच्या साथीदारांनी कोणताच गुन्हा केला नाही, त्यांना 'डॉक्टर्ड व्हिडियो' चा वापर करून अडकवले जात असल्याच यावेळी परिसरातील विद्यार्थ्यांनी सांगितलं.

दरम्यान, विद्यापीठात उमर खालिद आणि त्याचे सहकारी परतल्याची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांचे पथक तेथे दाखल झाले. पण त्यांनी विद्यापीठात प्रवेश केला नाही. विद्यापीठाच्या परवानगीशिवाय उमर खालिद आणि त्याच्या सहकार्‍यांना विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आम्ही अटक करू शकत नाही, असं पोलीस अधिकार्‍याने सांगितलं. विद्यापीठाने उमर खालिद आणि त्याच्या सहकाऱयांना आमच्या ताब्यात द्यावे किंवा त्यांनी आत्मसमर्पण करावं, असं आवाहन देखील पोलिसांनी यावेळी केलं आहे. तर दुसरीकडे, विद्यार्थ्यांनीही मात्र पोलिसांसमोर शरणागती न पत्करण्याचा निर्णय घेतला आहे. पण जर पोलिसांनी अटक केली तर त्याला विरोध करायचा नाही, तसंच कोणतीही हिंसा करायची नाही असा निर्णयही विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

9 फेब्रुवारी रोजी विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमादरम्यान देशविरोधी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार सध्या देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत आहे. कन्हैयासोबतच उमर खालिद, अनिर्बन भट्टाचार्य, रामा नागा, आशुतोष कुमार आणि अनंत प्रकाश अशी या पाच विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा आरोप आहे. हे सर्व विद्यार्थी कन्हैयाला अटक केल्यापासून फरार होते. अखेर काल रात्री उशिरा हे पाचही विर्द्यार्थी जेएनयूच्या कॅम्पसमध्ये दाखल झालेत.

कॅम्पसमध्ये परतल्यानंतर उमर खलिदने विद्यार्थांना संबोधित केलं. 'माय नेम इज उमर खालिद, अँड आय एम नॉट अ टेररिस्ट', असं म्हणत खालिद याने त्याच्याविरोधात ठेवण्यात आलेला देशद्रोहाचा आरोप फेटाळून लावला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


First published:

Tags: Abvp, JNU, Protest, Rajnath singh, अभाविप, राजनाथ सिंह

पुढील बातम्या