मुंबई – 16 एप्रिल : मुंबई देवनार डम्पिंग ग्राऊंड आगीप्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आली आहे. देवनार कचरा डेपोला आग लागली नव्हती तर ती लावण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.
दुसर्यांदा देवनार डम्पिंग ग्राऊंडला आग लागल्यानंतर पोलिसांनी याची चौकशी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर ही आग धातू गोळा करण्यासाठी आग लावण्यात येत असल्याचं स्पष्ट झालं. याप्रकरणी पोलिसांनी 9 भंगार व्यापार्यांना अटक केली आहे. आरोपींनी सांगितलं की, ही आग लोखंड गोळा करण्यासाठी लावली जात होती. आगीतून मिळणारा लोखंड भंगारवाल्यांच्या दुकानात आम्ही विकायचो. उलट दुकानदारच आम्हाला आग लावण्यासाठी पाठवत होते.
त्यानंतर पोलिसांनी दुकानदारांकडे चौकशी केली असता त्यांच्यापैकी कोणाकडेच परवाना नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तर अटक करण्यात आलेले 9 आरोपी हे अल्पवयीन आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
Follow @ibnlokmattv
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: डंपिंग ग्राऊंड, मुलुंड आणि देवनार