मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

देवनार डम्पिंगमध्ये पुन्हा लागली आग

देवनार डम्पिंगमध्ये पुन्हा लागली आग

êËÖêêËÖêpy

20 मार्च : देवनार डम्पिंग ग्राऊंडमध्ये काही दिवसांपूर्वी लागलेल्या आगीमुळे निर्माण झालेला संशयाचा धूर कायम असताना शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास तेथे पुन्हा आग लागली. ही आग अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आटोक्यात आणली. 2 तासांनंतर म्हणजे, दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ही आग पूर्ण विझल्याचे पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले.

इथल्या कचर्‍याच्या छोट्या तुकड्यांनी आधी पेट घेतला व नंतर आग भडकली. देवनार डम्पिंगवर वारंवार लागणाऱ्या आगीमुळे सुरक्षा व प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. अशास्त्रीय पद्धतीने टाकला जाणारा कचरा यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागतात. 27 जानेवारीला लागलेली आग विझविण्यास चार दिवस लागले होते. त्यानंतरही दोन वेळा देवनारमधील कचर्‍याने पेट घेतला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Follow @ibnlokmattv


First published:

Tags: डंपिंग ग्राऊंड, मुलुंड आणि देवनार