मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

देवनार डंपिंग ग्राऊंड हलवण्यासाठी उपोषण करणार्‍या चौघांची प्रकृती खालावली

देवनार डंपिंग ग्राऊंड हलवण्यासाठी उपोषण करणार्‍या चौघांची प्रकृती खालावली

Deonar

मुंबई - 08 फेब्रुवारी : देवनार डंपिंग ग्राऊंड हटवण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांची तब्येत खालावली आहे. उपोषणकर्त्यांपैकी 4 जणांची तब्येत काल रात्री उशीरा खालावल्याने त्यांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

देवनार डंपिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीच्या निषेधार्थ स्थानिक नगरसेवक सिराज शेख आणि काही स्थानिक रहिवासी गेल्या तीन दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. 8 दिवस उलटूनही ही आग धुमसतेच आहे आणि इथल्या रहिवाशांना आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावत आहेत. तरीही प्रशासना कडून यावर तोडगा काढण्यात आलेला नाही. यामुळे डंपिंगला हटवण्याच्या मागणीसाठी देवनार रहिवाशांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. काल (रविवारी) रात्री 1 वाजताच्या दरम्यान 4 आंदोलकांची तब्येत खालावली. अब्दुल बारी , फैय्याज मेहराज, फजल नेताजी, महम्मद हुसेन अशी या चार आंदोलकांची नावं आहेत. जोपर्यंत पालिका आयुक्त लिखित स्वरुपात आश्वासन देत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरुच ठेवणार असल्याचं आंदोलकांनं स्पष्ट केलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Follow @ibnlokmattv


First published:

Tags: डंपिंग ग्राऊंड, मुलुंड आणि देवनार