दिल्ली, 10 सप्टेंबर : दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप)नं 4 पैकी 3 जागा जिंकत आपला झेंडा फडकावलाय. तर काँग्रेसच्या एनएसयूआयनेही एक जागा जिंकली आहे.
गेल्या वर्षभरात देशभर विद्यार्थी आंदोलनं झालीयत आणि यातल्या बहुतांश आंदोलनात डावेविरूद्ध भाजपाची विद्यार्थी आघाडी असलेल्या अभाविप एकमेकांसमोर उभी ठाकताना दिसलीय. पण त्याचा प्रत्यक्ष निकाल विद्यापीठातल्या निवडणुकीत पहायला मिळालाय. दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या झालेल्या निवडणुकीत अभाविपनं 4 पैकी 3 जागा जिंकत सत्ता मिळवली आहे.
विशेष म्हणजे दोन वर्षानंतर काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या एनएसयूआयलाही एक जागा मिळालीय. अध्यक्ष, उपाध्यक्ष तसंच सचिवपद अभाविपला मिळालंय तर सहसचिवपद एनएसयूआयकडे गेलंय. अभाविपचा अमित तंवरची अध्यक्ष म्हणून निवडून आलाय. विशेष म्हणजे गेल्या काही काळात चर्चेत असलेल्या जेएनयूचीही निवडणूक पार पडलीये. त्या निवडणुकीकडेही देशाचं लक्ष आहे. इथं मात्र पुन्हा डावी विद्यार्थी संघटनाच बाजी मारणार की अभाविप दमदार एंट्री मारणार याची उत्सुकता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Abvp, अभाविप, दिल्ली विद्यापीठ, विद्यार्थी निवडणूक