मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

दिल्ली भ्रष्टाचारमुक्त करणार, केजरीवालांची गर्जना

दिल्ली भ्रष्टाचारमुक्त करणार, केजरीवालांची गर्जना

aap at ramlila (17)14 फेब्रुवारी : आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दिल्ली भ्रष्टाचार मुक्त करणार अशी घोषणा केलीये. तसंच अंहकार बाळगू नका, अंहकारामुळेचे काँग्रेस आणि भाजपचा पराभव झालाय. त्यामुळे तुम्ही या विजयामुळे अंहकार बाळगू नका, संयमाने वागा अशा शब्दात केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांचे कान उपटले.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने 70 पैकी 67 जागा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. विशेष म्हणजे 14 फेब्रुवारी 2014 रोजी केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. वर्षभरानंतर केजरीवाल यांनी आजच्या दिवसाची निवड करत शपथ घेतली. केजरीवाल यांनी शपथ घेतल्यानंतर आतापर्यंतच्या कडू गोड आठवणींचा अनुभवानुसार भाषण केलं. 14 फेब्रुवारी 2014 ला आपण सरकार बरखास्त केलं होतं. पण पुन्हा दिल्लीच्या जनतेनं आपल्याला भरभरून प्रेम दिलं. सर्व धर्मीय, श्रीमंत, गरीब आणि सर्वसामान्य जनतेनं 'आप'ला मतदान केलं. त्याबद्दल दिल्लीकरांचे आभार मानले तितके थोडे आहे. या विजयानंतर माझे काही सहकारी देशभरात ठिकठिकाणी होणार्‍या आगामी निवडणुकांमध्ये आप लढवणार अशा घोषणा करत आहे. पण इतकी घाई करू नका, हे योग्य नाही. मनात अंहकार बाळगू नका. या अंहकारामुळे काँग्रेस आणि भाजपचा पराभव झाला. जर आपण मनात अंहकार बाळगला तर आपण आपल्या मिशनपासून दूर जाऊ शकतो.त्यामुळे असं काही करू नका असा सल्ला केजरीवालांनी कार्यकर्त्यांना दिला. तसंच जर कुणी आप पक्षाची टोपी घालून गुंडगिरी किंवा काही चुकीचं काम करत असेल तर त्याला सरळ पोलिसांच्या ताब्यात द्या. पक्षाची बदनामी खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड इशाराही केजरीवाल यांनी दिला.

दिल्ली भ्रष्टाचारमुक्त राज्य करणं हे आपलं पहिलं मिशन असणार आहे. उद्या जर तुम्हाला कुणी लाच देत असले तर ती घ्या पण त्यांचं मोबाईलवर व्हिडिओ, ऑडिओ रेकॉर्ड करा आणि मला द्या. मी त्याच्यावर तात्काळ कारवाई करेल असं आवाहनही त्यांनी केलं. यावेळी त्यांनी किरण बेदी, अजय माकन यांचाही उल्लेख केला. किरण बेदी मला मोठ्या बहिणीसारख्या आहे. त्यांचा मी खूप सन्मान करतो. आम्हाला ही पार्टी, ती पार्टी, असं न करता दिल्लीला एक आगळंवेगळं शहर बनावायचंय आहे. यासाठी वेळ पडल्यास किरण बेदी, अजय माकन यांचं आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन घेऊ असंही केजरीवाल म्हणाले.

केजरीवाल यांच्या भाषणातील ठळक मुद्दे - माझे कार्यकर्ते हिरे आहे -केजरीवाल - भारतीय टीम यावेळीही वर्ल्डकप जिंकून येईल, अशी मी त्यांना शुभेच्छा देतो -केजरीवा - पक्षासाठी अनेकांनी नोकर्‍या सोडल्यात, पडद्याआड असलेल्या कार्यकर्त्यांची मेहनत हे आजच यश आहे - केजरीवाल - किरण बेदींचा मी खूप सन्मान करतो -केजरीवाल - किरण बेदी माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत -केजरीवाल - किरण बेदी , अजय माकन यांचं आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन घेणार आहोत -केजरीवाल - आम्हांला ही पार्टी ती पार्टी असं न करता दिल्लीला एक आगळंवेगळं शहर बनावायचंय -केजरीवाल - सरकारी गाडी घेणार, कार्यालय घेणार जर घेतलं नाही तर कामं कसं करणार ? - केजरीवाल - एखादा मंत्री रस्त्यावरून जात असताना वाहतूक बंद केली जाते हे अयोग्य आहे -केजरीवाल - व्यापार्‍यांनो तुम्ही बिनधास्त व्यापार करा, पण सर्व टॅक्स भरा -केजरीवाल - दिल्लीत व्हिआयपी संस्कृती बंद करणार -केजरीवाल - दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवणार -केजरीवाल - पंतप्रधान तुम्ही देश चालवा, मी दिल्ली चालवतो -केजरीवाल - दिल्लीत लवकरच जनलोकपाल विधेयक मंजूर करणार -केजरीवाल - आम्हाला सुरक्षित दिल्ली पाहिजेय -केजरीवाल - मला ताप आहे तरी औषध घेऊन इथं आलो -केजरीवाल - मी आणि माझे सहकारी 24 तास काम करणार -केजरीवाल - दिल्लीला भारतातील पहिलं भ्रष्टाचारमुक्त राज्य करायचंय -केजरीवाल - आप पक्षाची टोपी घालून गुंडगिरी किंवा काही चुकीचं काम करत असेल तर त्याला सरळ पोलिसांच्या ताब्यात द्या-केजरीवाल - काँग्रेस आणि भाजपचा अंहकारामुळे पराभव झाला - केजरीवाल - मी अंहकार बाळगणार नाही, पाच वर्ष दिल्लीकरांची सेवा करणार -केजरीवाल - मनात अंहकार बाळगू नका - केजरीवाल - जर आपण मनात अंहकार बाळगला तर आपण आपल्या मिशनपासून दूर जाऊ शकतो - केजरीवाल - आम्ही इथून लढणार, तिथून लढणार हे योग्य नाही - केजरीवाल - 14 फेब्रुवारी 2014 ला आपण सरकार बरखास्त केलं होतं पण यावेळी दिल्लीकरांनी भरभरून प्रेम दिलं -केजरीवाल - सर्व धर्मीय, श्रीमंत, गरीब आणि सर्वसामान्य जनतेनं 'आप'ला मतदान केलं -केजरीवाल ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: AAP, अरविंद केजरीवाल, आम आदमी पार्टी

पुढील बातम्या