Home /News /news /

दिल्ली पोलीस एक नंबरचे लाचखोर -केजरीवाल

दिल्ली पोलीस एक नंबरचे लाचखोर -केजरीवाल

aap vs delhi police 34564320 जानेवारी : दिल्ली पोलीस आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातला वाद दिवसेंदिवस चिघळत चाललाय. दिल्लीचे पोलीस लाचखोर आहे, पोलिसांच्या मदतीशिवाय सेक्स आणि ड्रग रॅकेटचे काळे धंदे चालूच शकत नाहीत, दिल्ली पोलीस जनतेकडून लाच घेतात आणि आयुक्तांमार्फत गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात असा घणाघाती आरोप केजरीवाल यांनी केला. एवढंच नाही तर पोलिसांविरोधात उपोषणाला बसणार असा इशाराही केजरीवाल यांनी दिला.

'दिल्ली पोलीस विरुद्ध आम आदमी पार्टी' या वादाची सुरुवात झाली ती कायदेमंत्री सोमनाथ भारती यांच्यामुळे. . दिल्लीचे कायदामंत्री सोमनाथ भारती यांनी काही दिवसांपूर्वी एका भागात छापा टाकण्याचे आदेश पोलिसांना दिले. पण, पोलिसांनी ते फेटाळले. यावरून त्यांच्यात शाब्दिक चकमकही झाली होती. कायदा मंत्र्यांचे आदेश न पाळणार्‍या पोलिसांवर कारवाई करावी आणि दिल्ली पोलिसांना दिल्ली राज्य सरकारच्या कक्षेत आणावं, यासाठी केजरीवाल यांनी हे आंदोलन पुकारलंय. या पाचही पोलीस अधिकारी सहकार्य करत नाही त्यांचं निलंबन करण्यात यावं अशी मागणी आम आदमी पार्टीने केली.

पोलिसांचं निलंबन जर होणार नसेल तर त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे केलीय. जर या अधिकार्‍यांवर सोमवार संध्याकाळपर्यंत कारवाई झाली नाही तर आपण उपोषणाला बसणार असा इशारा केजरीवाल यांनी दिला. दरम्यान, आज सकाळी केजरीवाल गृहमंत्रालयाच्या नॉर्थ ब्लॉक कडे जात असताना दिल्ली पोलिसांनी त्यांचा ताफा रेलभवन परिसरामध्ये अडवला. या वेळी केजरीवाल यांनी तिथंच आपल्या पाठिराख्यांसमोर छोटेखानी भाषण केलं. आपल्या सहकार्‍यांशी बोलताना केजरीवाल यांची दिल्ली पोलिसांवर जोरदार टीका केली.

आजपासून आमला स्वातंत्र्यदिन सुरू होतोय. आम्ही धरणे आंदोलन करणार आणि पोलिसांच्या अशा उद्दाम वागणुकीपासून स्वातंत्र्य मिळवणार आहे. काहीजण मला अराजकता माजवणारा माणूस म्हणतात, ठीक आहे मी अराजकता माजवणारा आहे असं समजा. पण पोलिसांच्या विरोधात 10 दिवसांसाठी धरणं आंदोलन करण्याची तयारी आहे गरज पडल्यास धरणं आंदोलन आणखी काही दिवस पुढे वाढवणार असा इशाराही केजरीवाल यांनी दिला. तसंच दिल्लीकरांनी आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहनही केलं.

अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल - पोलीस मात्र, केजरीवाल यांनी जंतरमंतरवर धरणं आंदोलन करावं अशी विनंती दिल्ली पोलिसांनी केलीये. पण केजरीवाल यांनी पोलिसांनी मागणी फेटाळून लावलीय. त्यामुळे कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिल्ली पोलीस आयुक्त त्यागी यांनी दिलाय. हे आंदोलन थांबवण्यासाठी केंद्रात हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज पंतप्रधानांचीही भेट घेतली. त्यापूर्वी त्यांनी दिल्लीच्या नायब राज्यपालांचीही भेट घेतली.
First published:

Tags: Aam aadmi party, AAP, Arvind kejriwal, Police, Sushilkumar shinde, आम आदमी, केजरीवाल, मुख्यमंत्री

पुढील बातम्या