मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

दिल्ली ते गल्ली सेनेचा भाजप विरोधात सूर कायम

दिल्ली ते गल्ली सेनेचा भाजप विरोधात सूर कायम

Uddhav modi09 मार्च : शिवसेना केंद्रात आणि राज्यात सरकारमध्ये सहभागी असली, तरी दिल्ली ते गल्ली सरकारचा विरोध करत असल्याचं चित्र आहे. भूसंपादनाच्या मुद्द्यावरून शिवसेनेने लोकसभेत आक्रमक भूमिका घेतलीये. शिवसेनेचा भूसंपादनाला विरोध नसून शेतकर्‍यांचा आक्रोश समजून घ्या, अशी भूमिका सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत मांडली.

लोकसभेत बोलताना अरविंद सावंत यांनी शेतकर्‍यांच्या जमिनी भाडेतत्त्वावर घेण्याची सूचनाही त्यांनी केली. तर मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार आणि मंत्र्याच्या बैठकीत आक्रमक सूर लावला. या बैठकीत युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेही उपस्थित होते. सरकारकडून राज्यातील जनतेचे बहुतांश प्रश्न सोडवले गेलेले नाहीत असा सूर आमदारांनी लावला. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदार आणि मंत्र्यांना शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर आक्रमक व्हायचे आदेश दिले आहेत. कापसाला न मिळणारा हमीभाव, शेतीच्या इतर प्रश्नांवर आक्रमक व्हायला त्यांनी सांगितलंय. तसंच आपण सरकारमध्ये असलो तरीही जनतेचे प्रश्न विधिमंडळात मांडायला मागेपुढे पाहू नका असा फर्मानही त्यांनी कार्यकर्त्यांना सोडलाय. विशेष म्हणजे भाजपचे नेते नितीन गडकरी, रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांची भूसंपादन विधेयकाबाबत समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. पण तरीही उद्धव यांनी भूसंपादन विधेयका विरोध राहणार असं ठणकावून सांगितलं होतं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

[if0] Follow @ibnlokmattv[sc0]

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Shiv sena, उद्धव ठाकरे, भूसंपादन विधेयक, शिवसेना