मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

दिलीप वळसे-पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ?, 29 एप्रिलला घोषणा

दिलीप वळसे-पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ?, 29 एप्रिलला घोषणा

dilip walse patil27 एप्रिल : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची उचलबांगडी होणार हे आता जवळपास निश्चित झालंय. येत्या 29 एप्रिलला नव्या प्रदेशध्यक्षांच्या नावाची घोषणा होणार आहे. दिलीप वळसे-पाटील यांचं नावं सर्वात पुढे असून त्यांच्या नावावर एकमत होण्याची शक्यता आहे. आज राष्ट्रवादीच्या कोअर कमेटीची बैठक पार पडली यात हा निर्णय घेण्यात आला.

एप्रिलअखेर राष्ट्रवादीत मोठे फेरबदल होणार आहे. प्रदेशाध्यक्ष पदावरून सुनील तटकरे यांची उचलबांगडी होणार आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत प्रदेशाध्यक्षपदाच्या नावावर चर्चा झाल्याचं कळतलंय. येत्या 29 एप्रिलला नव्या प्रदेशध्यक्षांच्या नावाची घोषणा होणार असल्याचं कळतंय. प्रदेशाध्यक्षपदासाठी जयंत पाटील, राजेश टोपे, दिलीप वळसे-पाटील आणि शशिकांत शिंदे यांची नावं चर्चेत आहे. दिलीप वळसे-पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. प्रशासकीय आणि संसदीय अनुभवाला प्राधान्य देण्यात आलंय. दिलीप वळसे पाटील यांच्या अनुभवानुसार त्यांच्याच गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्यातील मतभेदामुळे प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी होणार असल्याचं कळतंय. तसंच सिंचन घोटाळ्यातल्या चौकशीचा परिणाम हेही कारण समोर येतंय. एवढंच नाहीतर प्रदेशाध्यक्ष म्हणून तटकरे छाप पाडण्यात कमी पडले. त्यामुळेच तटकरेंना हटवण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

[if0] Follow @ibnlokmattv[sc0]

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Ajit pawar, Sunil tatkare, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, राजेश टोपे, सिंचन घोटाळा, सुनील तटकरे