मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

दाभोळ वीज प्रकल्पाचा मार्ग मोकळा, 1 नोव्हेंबरपासून वीजनिर्मिती

दाभोळ वीज प्रकल्पाचा मार्ग मोकळा, 1 नोव्हेंबरपासून वीजनिर्मिती

012

06 सप्टेंबर : कोकणातील बंद पडलेला दाभोळ वीज प्रकल्प आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. येत्या 11 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या प्रकल्पाचं भूमीपूजन करण्यात येणार आहे.

दाभोळ वीज प्रकल्पाचे विभाजन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने या बैठकीत घेतला आहे. त्यानुसार रत्नागिरी पॉवर कंपनी आणि रत्नागिरी एलएनजी कंपनी स्थापन करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. या प्रकल्पातून 500 मॅगावॅट वीज तयार होणार आहे. तसंच ही वीज रेल्वेला पुरवण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार या प्रकल्पातून निर्माण होणारी पहिली 500 मेगावॅट वीज 4 रुपये 79 पैसे प्रतियुनीट या दराने रेल्वेला दोन वर्षांसाठी पुरवली जाणार आहे. त्यानंतरही रेल्वे 5 रुपय प्रतीयूनिट यादराने विज खरेदी करणार आहे. राज्य सरकारकडून या प्रकल्पाला सर्वतोपरी मदत करण्यात येणार आहे.

दरम्यान, राज्य सरकार दाभोळ प्रकल्पातून निर्माण होणारी वीज विकत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तर दाभोळ प्रकल्पातल्या या विजेला व्हॅटमधून सुट मिळणार आहे अशीही माहिती मिळतेय. येत्या 1 नोव्हेंबरपासून दाभोळ प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

 दाभोल प्रकल्पाचं रडगाणं

- 1992 : एन्रॉन ही अमेरिकन कंपनी आणि महाराष्ट्र शासन यांच्यात करार, बांधकामाला सुरुवात

- 1995 : करारात भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवत युती सरकारनं करार रद्द केला, नंतर नवा करार केला

- 1999 : प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण, 740 मेगावॅट वीजनिर्मितीला सुरुवात

- नैसर्गित वायूचा वापर करून विजेच्या निर्मितीला सुरुवात

- त्यावेळी 15,000 लोक दाभोळ प्रकल्पात नोकरी करत होते

- 2001 : एन्रॉन या मुख्य कंपनीनं अमेरिकेत दिवाळखोरी घोषित केली

- 2001 : वाद आणि एन्रॉनच्या दिवाळखोरीमुळे दाभोळ प्रकल्प ठप्प

- 2006 : NTPC आणि GAIL या सरकारी कंपन्यांनी प्रकल्प चालवायला घेतला

- 2006 : 3 मोठ्या यंत्रांमध्ये बिघाड झाल्यामुळे काम पुन्हा ठप्प

- 2009 : 900 मेगावॅट वीजनिर्मितीला सुरुवात

- 2013 : वायू पुरवठा बंद झाल्यामुळे वीजनिर्मिती पुन्हा ठप्प

- फेब्रुवारी 2015 : महाराष्ट्र शासनाच्या महावितरण कंपनीनं वीज खरेदी करार रद्द केला

- सप्टेंबर 2015 : रेल्वे खात्यानं दाभोळकडून वीज खरेदी करायला उत्सुकता दाखवली

- सप्टेंबर 2015 : नोव्हेंबर 2015 मध्ये वीजनिर्मिती सुरू करण्याची केंद्र सरकारची घोषणा

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

[if0] Follow @ibnlokmattv[sc0]

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Devendra Fadnavis, दाभोळ वीज प्रकल्प