Home /News /news /

दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून 2 संशयितांची नावं हायकोर्टापुढे सादर

दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून 2 संशयितांची नावं हायकोर्टापुढे सादर

dabholkar case44428 ऑक्टोबर : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी प्रदीर्घ तपासानंतर सीबीआयने 2 संशयितांची नावं हायकोर्टाकडे सोपण्यात आलीये. हायकोर्टाला बंद लिफाफ्यात या दोन संशयितांची नाव सादर करण्यात आली आहे. तसंच रुद्रगौडा पाटीलबद्दल अहवाल सादर ने केल्याबद्दल कोर्टाने सीबीआयवर ताशेरे ओढले आहे.

दाभोलकर हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी तपासात असमर्थता दर्शवल्यानंतर तपास हा सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. सीबीआयने या प्रकरणाची तपासणी करून अखेर दोन संशयितांची नाव कोर्टापुढे सादर केलीये. यावेळी हायकोर्टाने सीबीआयवर ताशेरेही ओढले. रुद्रगौडा पाटीलबद्दल अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. पण, सीबीआय अहवाल सादर करू शकली नव्हती. पुढच्या वेळी आम्ही सविस्तर अहवाल सादर करू असं सांगण्यात आलं होतं. तरीही आज अहवाल सादर करता आला नाही. सरकारी वकिलांनी अहवाल उशिरा दिल्यांबद्दल आपली चूक असल्याचं मान्य केलंय. मात्र, आता सीबीआयने एवढ्या तपासानंतर 2 संशयितांची नाव सादर केली ती नावं कुणाची आहे असा सवाल आता उपस्थित झालाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: CBI, डॉ. नरेंद्र दाभोलकर, सीबीआय, हायकोर्ट

पुढील बातम्या