मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /'दाभोलकरांच्या मारेकर्‍यांना अटक करा',राज्यभरात निदर्शनं

'दाभोलकरांच्या मारेकर्‍यांना अटक करा',राज्यभरात निदर्शनं

    narendra dabholkar3320 ऑगस्ट : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून हा पुरोगामी आवाज दडपण्यासाठी फॅसिस्ट शक्तींनी हत्या केल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते करत आहे. राज्यभरात मुंबई,पुणे,नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद इथं कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून हल्लेखोरांना ताबडतोब अटक करावी अशी मागणी कार्यकर्ते करत आहे.

    दाभोलकर यांच्या खुनाचा निषेध करण्यासाठी नाशिकमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी जेलभरो आंदोलन केलं. दाभोलकरांच्या मारेकर्‍यांना ताबडतोब अटक करण्याची मागणी या कार्यकर्त्यांनी केली. नाशिकमधल्या सामाजिक संस्था आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांनी खुनाचा निषेध केला. पोलिसांना निषेध करणार्‍या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय.

    तर कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र दाभोलकरांच्या खुनाचा निषेध करण्यात येतोय. दाभोलकरांच्या खुनाचा निषेध करण्यासाठी इचलकरंजीत मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा समावेश आहे. तसंच शेकडो नागरिक मोर्चामध्ये सहभागी झाले. शहरातल्या प्रमुख मार्गांवरून हा मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शेकडो नागरिक सहभागी झाले होते. तसंच औरंगाबादमध्ये आंबेडकर गट आणि भीमशक्ती विद्यार्थी संघटनेनं क्रांती चौक इथं निदर्शन केली. आणि पोलीस दलाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

    First published:
    top videos