27 ऑगस्ट : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला आज एक आठवडा पूर्ण झालाय. पण, पोलिसांना मारेकर्यांचा काहीही सुगावा लागलेला नाही. या प्रकरणी काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं होतं. पण अजून तरी काही ठोस माहिती समोर आलेली दिसत नाहीये.
दाभोलकरांचा खून कोणी केला असावा याबाबत वेगवेगळे सिद्धांत मांडले जात आहे. मागिल आठवड्यात 20 ऑगस्ट रोजी सकाळी साडे सातच्या सुमारास दोन हल्लेखोरांनी दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडून खून केला.
या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. दाभोलकर यांच्या खुनाच्या अजूनही शोध लागलेला नाही. मुंबई आणि पुणे क्राईम ब्रांचची टीम मारेकर्यांचा शोध घेत आहे. पण अजूनही पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही.
डॉ. दाभोलकरांच्या खुनाच्या तपासासंबंधीच्या घडामोडींवर
कुणावर संशय?
पुरावे काय मिळाले?
आयबीएन-लोकमतचे सवाल
1) एका आठवड्यानंतरही पोलीस तपासाविषयी का सांगू शकत नाहीत?
2) फक्त एकाच हल्लेखोराचंं रेखाचित्र का प्रसिद्ध केलं?
3) दुसर्या हल्लेखारोचं रेखाचित्र का नाही?
4) वाहनाचा पूर्ण नंबर आणि ती मोटर सायकल का मिळाली नाही?
5) तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज अपुरं ठरतंय का?
6) पूर्वनियोजित कट होता तर तो कुणी रचला?
7) धमकी देणार्यांविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई का केली नाही?
8) तपास सीआयडी किंवा सीबीआयकडे द्यावा का?
9) पुण्याचे पोलीस आयुक्त आज तरी तोंड उघडतील का?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.