26 ऑगस्ट : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला आज 6 दिवस उलटून गेलेत. पण एकही आरोपी अजून पकडलेला नाही. अजून पोलिसांच्या हाती ठोस पुरावे लागले नाहीत त्यामुळे आरोपींना अटक करण्यासारखी परिस्थिती नसल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.
यामागचे सूत्रधार नेमके कोण आहेत, याचा तपास लागणं जास्त गरजेचं असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी रविवारी रात्री सातार्यात दाभोलकरांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मात्र या भेटीचा तपशील कळू शकलेला नाहीये. गेल्या आठवड्याभरात मुख्यमंत्र्यांनी दाभोलकर कुटुंबीयांची दुसर्यांदा भेट घेतली.
तर डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा निषेध आणि आरोपींना पकडण्याची मागणी करत वेगवेगळ्या परिवर्तनवादी संघटनांनी आज पुण्यात मूक मोर्चा काढला. कलेक्टर ऑफिसवर काढलेल्या या मोर्चात तरूण मोठया संख्येनं सहभागी झाले होते. मारेकर्यांना तातडीनं अटक करा, अशी मागणी करत त्यांनी पोलिसांच्या तपासाबाबत नाराजी व्यक्त केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.