मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /दाभोलकरांच्या खुनाचा तपास जातपंचायतीच्या दिशेने सुरू

दाभोलकरांच्या खुनाचा तपास जातपंचायतीच्या दिशेने सुरू

    narendra dabholkar murder27 ऑगस्ट : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपास जातपंचायतीच्या दिशेनंही सुरू आहे. नाशिक पोलिसांनी जातपंचायतीच्या लोकांचा शोध सुरू केलाय. नाशिकमध्ये जातपंचायतीच्या घटना समोर आल्या होत्या.

    त्या पार्श्वभूमीवर 8 ऑगस्ट रोजी दाभोलकरांनी नाशिकमध्ये जातपंचायत मूठमाती परिषद घेतली होती. जातपंचायतीची दहशत, त्यांचे आर्थिक हितसंबंध आणि राजकीय पाठिंबा या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आंदोलन छेडलं होतं.

    जातपंचायतीच्या दहशतीविरोधात कडक कायदा करण्याची गरज दाभोलकरांनी त्यावेळी नाशिकमध्ये व्यक्त केली होती. अंनिसच्या काही कार्यकर्त्यांनाही जातपंचायतीच्या सदस्यांकडून धमक्या आल्या होत्या. त्यााचा शोध नाशिक पोलीस घेत आहेत. मागिल आठवड्यात 20 ऑगस्ट रोजी सकाळी साडे सातच्या सुमारास दोन हल्लेखोरांनी दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडून खून केला.

    या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. दाभोलकर यांच्या खुनाच्या अजूनही शोध लागलेला नाही. मुंबई आणि पुणे क्राईम ब्रांचची टीम मारेकर्‍यांचा शोध घेत आहे. पण अजूनही पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही.

    First published:
    top videos