दापोली– 25 मार्च : देहेण वाळीत प्रकरणी दापोली पोलिसांनी अखेर 17 जणांना अटक केली होती. मात्र, काही तासाचं या सगळ्यांना जामिनही मिळाला आहे. पोलीस लवकरच या प्रकरणाचा अहवाल मंत्र्यांना सादर करणार आहेत.
देहेण गावात एका कुटुंबावर जातपंचायतीच्या सदस्यांनी 5 वर्षांपासून बहिष्कार घातला होता. या कुटुंबातील वृद्ध महिलेचं निधन झालं होतं. पण जातपंचायतीच्या जाचामुळे या महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी कुणीही पुढे मदतीसाठी पुढे येत नव्हतं. अखेर पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्या महिलेवर 16 तासांनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी 17 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली होती. अखेर सर्वांना आज अटकही करण्यात आली मात्र काही वेळातचं त्यांना जामिनही मिळाला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
Follow @ibnlokmattv
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.