मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'दाऊद एकदम फिट', त्याला काहीही झालं नाही, छोटा शकीलने केला दावा

'दाऊद एकदम फिट', त्याला काहीही झालं नाही, छोटा शकीलने केला दावा

chhota_Shakil_dawood26 एप्रिल : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला जीवघेणं गँगरिन झाल्याचं उघड झालंय. दाऊदचं गँगरिन अतिशय बळावलं आहे. दाऊद चालू शकत नाही आणि दाऊदचे दोन्ही पाय कापावे लागणार आहेत. सध्या कराचीतल्या घरात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, दाऊदचा साथीदार छोटा शकीलने हे वृत्त फेटाळले आहे. नेटवर्क 1 8ला दिलेल्या फोनवर शकीलने 'दाऊद फिट' असल्याचा दावा केलाय.

डॉन दाऊद इब्राहिम शेवटच्या घटका मोजत असून त्याला जीवघेणा गँगरिन झाला असून तो काही महिन्यांचा पाहुणा असल्याची माहिती समोर आल्यामुळे एकच खळबळ उडालीये. लियाकत नॅशनल हॉस्पिटल आणि कंबाइन्ड मिलिटरी हॉस्पिटलमधले डॉक्टर्स दाऊदवर उपचार करत आहेत. हाय बीपी आणि डायबेटिसमुळे दाऊदचं गँगरीन बळावलं आहे. संपूर्ण शरीरात गँगरिन पसरत असल्याचा डॉक्टरांचा अंदाज आहे. दाऊदला आएसआयने सध्या संरक्षण दिलंय. त्याला कराचीमध्येच ठेवण्याचा निर्णय उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आलाय. पण, दाऊदचा उजवा हात अर्थात छोटा शकीलने हा दावा फेटाळून लावलाय. दाऊदची प्रकृती ठीक आहे. त्याला कोणताही आजार झालेला नाही. मी विमानतळावर येण्याच्या आधीच दाऊदला भेटून आलोय. त्याची तब्येत ठीक असून छोटे मोठे आजार होतच असताच अशी माहिती शकीलने दिलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: Dawood, Pakistan, अंडरवर्ल्ड, छोटा शकील, डॉन, दाऊद इब्राहिम

पुढील बातम्या