27 डिसेंबर : अंडरवर्ल्ड डॉन आणि 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानमधल्या कराची या शहरातच असल्याचा दावा पाश्चिमात्य गुप्तचर यंत्रणांनी केला आहे.
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याला ताब्यात देण्यासाठी भारताकडून वारंवार मागणी करूनही 'तो आमच्या देशात नाहीच' असा पाकिस्तानचा कांगावा खोटा पाडणारे नवे पुरावे गुप्तचर यंत्रणांच्या हाती आले आहेत. दाऊदच्या संभाषणाची ध्वनीफितच यंत्रणांना मिळाली असून त्याद्वारे दाऊद कराचीतील क्लिफ्टन भागात रहात लपून बसल्याचं समोर आले आहे. दाऊद आपल्या दुबईतील सहकार्यासोबत एका जमिनीच्या व्यवहारासंबंधी बोलत असल्याचे संघटनेने म्हटलं आहे. पाश्चिमात्य गुप्तचर संस्थांनी टॅप केलेलं दाऊद आणि दुबईतल्या व्यक्तीशी प्रॉपर्टी डीलबद्दलचं संभाषण रेकॉर्ड झाल्यानं पाकिस्तानला चपराक बसली आहे. हे संभाषण आयबीएन-नेटवर्कच्या हाती लागलं आहे. यात आपल्याकडे दुबईतील शेख झैद रोड या आलिशान भागातील 1100 कोटी रुपये किमतीचा 5 लाख चौरस फुटाचा भूखंड असल्याचे दाऊदने म्हटलं आहे. 'कराचीमध्ये माझ्या मालकीच्या शेकडो कोटींच्या बेनामी मालमत्ता आहेत,'असेही दाऊद म्हणतो. तो दुबईतील एक रियल इस्टेट एजंट यासीर याच्याशीही चर्चा करताना आढळला आहे. हा एजंट पाकिस्तानातील बडया उद्योगपतीचा मुलगा असल्याचे समजते. या गुप्तहेर संघटनेने ही संभाषणाची टेप भारताची गुप्तहेर संघटना रॉ कडे सोपविली आहे. पण हे रेकॉर्डी त्याच दोघांमधल्या संभाषणाचं आहे का, हे तपासण्याचं काम सुरू आहे. दाऊदमुळे पाकिस्तानला कसा फायदा होतो ?+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dawood ibrahim, Pakistan, दाऊद इब्राहिम