मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

दाऊदला घाबरत नाही, राजनने डी गँगला डिवचलं

दाऊदला घाबरत नाही, राजनने डी गँगला डिवचलं

Rajan-arrest-bali28 ऑक्टोबर : कुख्यात गँगस्टर छोटा राजन ऊर्फ राजन निकाळजेला इंडोनेशियात अटक करण्यात आलीये. पण अटकेनंतरही राजनची खुमखुमी काही कमी झाली नाही. आपण कुणालाही भीत नाही अशी बेफाम प्रतिक्रिया राजनने दिली.

अटकेनंतर राजनला सध्या बालीमधील जेलमध्ये ठेवण्यात आलंय. जेलमधून राजनला शिफ्ट करत असताना आयबीएन नेटवर्कच्या प्रतिनिधीने राजनाला सवाल केला असता 'आपण दाऊद इब्राहिमला भीत नाही' असं राजन म्हणाला. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी राजनला अटक करण्यात आली. राजनच्या अटकेनंतर दाऊद इब्राहिमचा उजवा हात मानला जाणारा छोटा शकीलने राजनला सोडणार नसल्याची धमकी दिली होती. त्यावर राजनने डी गँगवर पलटवार करत आपण कुणाला भीत नाही असं म्हटलंय. परंतु, राजनला 15 दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली होती अशी माहिती आयबीएन नेटवर्कच्या हाती लागलीये. छोटा शकील ऑस्ट्रेलियामध्ये राजनावर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारी होता. तेथून त्याने पळ काढला आणि बालीमध्ये आसरा घेतला. इथंच त्याला अटक झाली. दुसरीकडे राजनला अटक झाली की त्याने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी पोलिसांना शरण आला असा तर्क लढवला जात आहे. राजनच्या विरोधात मुंबई पोलिसांनी अगोदरच रेड कॉर्नर नोटीस जारी केलीये. इंडोनेशिया आणि भारतात प्रत्यार्पण करारानुसार आठवड्याभरात राजन भारताच्या ताब्यात येईल.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Dawood ibrahim, गँगस्टर, छोटा शकील, दाऊद इब्राहिम

पुढील बातम्या