02 जून : महाराष्ट्र आणि राजस्थानात दलितांवर होणार्या वाढत्या अत्याचारांची दखल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी घेतलीये. सोनिया गांधी यांनी त्यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय.
दलितांवरचे अत्याचार असे प्रकार थांबवण्यासाठी केंद्र सरकारनं पावसाळी अधिवेशनात विधेयक आणावं अशी मागणी सोनिया यांनी या पत्रामधून केलीये.
तसंच यूपीए सरकारनं यासंबंधी काढलेल्या वटहुकूमाचं कायद्यात रुपांतर करण्यास सध्याचं केंद्र सरकार अपयशी ठरल्याबद्दल नाराजीही व्यक्त केलीये. विशेष म्हणजे या पत्रांमध्ये सोनिया गांधी यांनी भाजपची सत्ता असलेल्या 2 राज्यांमधल्या काही घटनांचा उल्लेख केलाय. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातल्या सागर शेजवळ खून प्रकरणाचाही समावेश आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narendra modi, NDA, Sonia gandhi, अत्याचार, दलित, भाजप, मोदी, सोनिया गांधी