मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /दरेकर-निंबाळकर यांचं निलंबन अखेर मागे

दरेकर-निंबाळकर यांचं निलंबन अखेर मागे

    pravin darekar31 जुलै : मनसेचे आमदार प्रवीण दरेकर आणि शिवसेनेचे आमदार ओमराजे निंबाळकर यांचं निलंबन अखेर आज मागे घेण्यात आलंय. संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी याबाबतचा प्रस्ताव आज विधानसभेत मांडला. मुंबईतल्या प्रश्नावर सभागृहात मुख्यमंत्री उत्तर देत असताना प्रवीण दरेकर यांनी त्यांच्याविरोधात अपशब्द वापरला होता. त्यावरुन त्यांचं याच अधिवेशनात 26 जुलैला निलंबन केलं गेलं होतं.

    मात्र दरेकर यांनी आपण कोणताही अपशब्द उच्चारला नव्हता असा दावा केला होता.तर ओमराजे निंबाळकर यांनी अर्थसंकस्पीय अधिवेशनात उस्मानाबादच्या पाणी प्रश्नावर आक्रमक होत अध्यक्षांसमोरचा राजदंड उचलला होता. त्याबद्दल त्यांचं 13 एप्रिल रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं होतं. पण या निलंबनाविरोधात विरोधी पक्षांनी आक्रमक भुमिका घेतली होती.

    ही विरोधकांची मुस्कटदाबी आहे असं म्हणत सरकारवर दबाव आणला. आणि कामकाज दोन दिवस बंद पाडलं होतं. त्यामुळे सरकारनं विरोधकांशी चर्चा करून निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. तर ओमराजे निंबाळकरांनी अध्यक्षांच्या समोरचा राजदंड पळवला होता, म्हणून त्यांच्यावर सभागृहात गैरवर्तन केल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. पण आज त्या दोघांचं निलंबन अखेर मागे घेण्यात आलंय. तर शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते यांचं निलंबन मागे घेण्यात आलेलं नाही. रावतेंच्या निलंबनाचा निर्णय सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याकडे देण्यात आला आहे. उद्या त्यांचं निलंबन मागे घेण्याची शक्यता आहे.

    First published:

    Tags: दिवाकर रावते, निलंबित, प्रवीण दरेकर, शिवाजीराव देशमुख, सभापती, सिंचन