मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /दरेकर-निंबाळकरांचं निलंबन उद्या मागे, रावतेंचा निर्णय सभापतींकडे

दरेकर-निंबाळकरांचं निलंबन उद्या मागे, रावतेंचा निर्णय सभापतींकडे

    darekar and ravate30 जुलै : विरोधी पक्षांच्या आमदारांच्या निलंबनावरून निर्माण झालेला तिढा अखेर सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सुटला. विरोधकांच्या सरकारशी चर्चा झाल्यानंतर विरोधकांनी आपलं ठिय्या आंदोलन मागे घेतलं.

    त्या बदल्यात मनसेचे आमदार प्रवीण दरेकर, शिवसेनेचे आमदार ओमराजे निंबाळकर यांचं निलंबन बुधवारपर्यंत मागे घेण्याचं आश्वासन सरकारनं दिलंय.

    तर शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते यांचं निलंबन मागे घेण्याबाबत विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख निर्णय घेतील असं संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलंय.

    शुक्रवारी सिंचन प्रश्नावर विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या दालनात बैठक सुरू होती. या बैठकीत रावते यांनी असभ्य वर्तन केल्याचा ठपका ठेवत 31 डिसेंबरपर्यंत निलंबित करण्यात आलंय. तर प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांनी उत्तर देऊनही शिवीगाळ केली होती. या प्रकरणी दरेकर यांचंही 31 डिसेंबरपर्यंत निलंबन करण्यात आलंय. तर ओमराजे निंबाळकर यांनी राजदंड पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता या प्रकरणी त्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.

    First published: