14 ऑक्टोबर : मागाठाणे विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांनी आपल्याविषयी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणारी पत्रकं वाटल्याचा आरोप मनसेचे उमेदवार प्रवीण दरेकर यांनी केलाय. या प्रकरणी दरेकरांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
एकीकडे मनसे आणि शिवसेना निवडणुकीच्या निकालानंतर एकत्र येतील अशी चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे मागाठाणेमध्ये वेगळाच प्रकार घडलाय.'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रवीण दरेकर यांचं शिवसेनेस जाहीर समर्थन' अशा आशयाची पत्रकं मागाठणे विधानसभा मतदारसंघामध्ये ठिकठिकाणी पाहण्यास मिळत आहे. या पत्रकाच्या माध्यमातून आपला पाठिंबा प्रकाश सुर्वेंना असल्याचं भासवण्यात आल्याचा आरोप प्रवीण दरेकरांनी केला आहे. या मतदार संघामध्ये प्रवीण दरेकर याच नावाचे अपक्ष उमेदवारही निवडणूक लढवत असून त्या नावाचा फायदा घेत, फसवा वापर केला जात असल्याचा आरोप दरेकरांनी केलाय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MNS, Shiv sena, प्रवीण दरेकर, मनसे, शिवसेना