मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

पी.व्ही.सिंधूने रचला इतिहास, बॅडमिंटनमध्ये भारताला सिल्व्हर मेडल

पी.व्ही.सिंधूने रचला इतिहास, बॅडमिंटनमध्ये भारताला सिल्व्हर मेडल

2016 Summer Olympics

19 ऑगस्ट : रिओ ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवण्याचं पी.व्ही.सिंधूचं स्वप्न जरी भंगलं असलं तरी सिल्व्हर मेडलवर आपलं नावं कोरून तिने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. डोळ्यांचं पारणं फेडणार्‍या, क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवत नेणार्‍या अत्यंत चुरशीच्या लढतीत अव्वल मानांकित स्पेनच्या कॅरोलिना मरिन हिनं सिंधूचा पराभव केला. असं असलं तरी रिओमध्ये ऐतिहासिक 'रुपेरी' कामगिरी करणार्‍या सिंधूने शेवटच्या क्षणापर्यंत कडवी झुंज देत संपूर्ण देशवासियांची मनं जिंकली. पहिल्या गेममध्ये पिछाडीवर असताना 19 व्या गुणानंतर सिंधूने दमदार स्मॅशच्या जोरावर पुनरागमन केलं आणि पहिला गेम 21-19 असा जिंकला. त्यानंतर दुसर्‍या गेममध्ये मात्र कॅरोलिनाने चोख कामगिरी करत 21-12 असं पुनरागमन केलं. त्यामुळे सामना तिसर्‍या आणि निर्णायक गेमपर्यंत पोहोचला. तिसर्‍या गेममध्ये दोघांमध्येही गुणांसाठी चुरशीची लढत पाहायला मिळाली. पण शेवटच्या गेममध्ये कॅरोलिनाने 21-15 अशी आघाडी घेत सामना जिंकून गोल्ड मेडलवर आपलं नाव कोरलं. 21 वर्षांची पी.व्ही.सिंधू ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला ठरली. याशिवाय, ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत सिल्व्हर मेडल जिंकून देण्याचा इतिहास सिंधूने घडवला आहे.

सिंधू आणि कॅरोलिनामध्ये आतापर्यंत 7 आंतरराष्ट्रीय सामने
 • 3 सामन्यांत सिंधू विजयी
 • कॅरोलिना 4 सामन्यांत विजयी
 • ज्युनिअर चॅम्पियनशीपमध्ये सिंधूनं कॅरोलिनाला 21-17, 21-19 असं हरवलं
 • मालदिव स्पर्धेत सिंधूचा पुन्हा विजय
 • 2014- वर्ल्ड चॅम्पियनशीप कॅरोलिनाकडे
 • 2015- सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय ग्रां प्रि. कॅरोलिनाचच दबदबा
 • 2016 च्या सुरुवातीला सिंधूनं कॅरोलिनाला हरवलं
 • महिनाभरातच हाँगकाँग ओपन सुपर सीरिजमध्येही कॅरोलिनाचा दबदबा
 अशी गाठली सिंधूने फायनल
 • अनेक अग्रमानांकित खेळाडूंचा पराभव
 • प्राथमिक फेरीत हंगेरीच्या 64 व्या मानांकित लौरा सरोसीचा पराभव
 • प्राथमिक फेरीतच 20 व्या मानांकित मिशेल लीचा पराभव
 • उपांत्यपूर्व फेरीत 8 व्या मानांकित ताई ज्यू यिंगचा पराभव
 • उपांत्यपूर्व सामन्यात दुसर्‍या मानांकित वैंग यिहानचा पराभव
 • उपांत्य सामन्यात 6 व्या मानांकित नोझोमी ओकुहाराचा पराभव
सिंधूची झळाळती कारकीर्द
 • 2009 - सब ज्युनियर एशियन बॅडमिंटन स्पर्धा - ब्राँझ मेडल
 • 2010 - इराण फज्र आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा - सिल्व्हर मेडल
 • 2010 - जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीप- उपांत्य फेरीत धडक
 • 2010 - उबेर कपमध्ये आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सहभाग
 • 2012 - जागतिक बॅडमिंटन क्रमवारीतील 20 खेळाडूंमध्ये समावेश
 • 2013 - जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली महिला
 • 2013 - मकाऊ ओपन ग्रॅण्ड प्रिक्समध्ये सुवर्णपदक
 • 2013 - भारत सरकारद्वारे अर्जुन पुरस्कार देऊन सन्मान
 • 2014 - जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सलग दोन मेडल्स जिंकून सेमीफायनलमध्ये धडक
 • 2015 - भारत सरकारद्वारे पद्मश्री पुरस्काराने गौरव
 • 2016 - रिओ ऑलिम्पिकमध्ये सेमीफायनल जिंकून सुवर्णपदक जिंकण्याची संधी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: P v sindhu, Spain, फायनल, स्पेन

पुढील बातम्या