Home /News /news /

मुंबईत आतापर्यंत 129 गोविंदा जखमी

मुंबईत आतापर्यंत 129 गोविंदा जखमी

dahi_handi_mumbai434406 सप्टेंबर : गोविंदा रे गोपाळा..बोल बजरंग बली की जय..गो गो गोविंदा आणि डीजेच्या तालावर बेधुंद होतं गोविंदा आता खर्‍या अर्थाने आला आहे. मुंबईसह राज्यभरात आज दहीहंडीचा उत्साह आहे...मुंबई आणि ठाण्यात तर सकाळपासूनच गोविंदा पथकांचा जल्लोष आहे. थराचा थर लावत 129 गोविंदा जखमी झाले आहे. जखमी गोविंदांवर केईएम हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल, राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, हायकोर्टाच्या निर्बंधामंुळे आणि दुष्काळामुळे यंदा उत्साह काहीसा कमी झालेला जाणवतोय. पण मुंबई आणि परिसरात सकाळपासून थरावर थर रचले जातायेत. आणि हंडी फोडण्यासाठी सलामी दिली जातेय. पण पाण्याचा वापर मात्र टाळला जातोय. गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी अनेक ठिकाणी सुरक्षेचे उपायही केले गेले आहेत. अनेक ठिकाणी नेहमीप्रमाणे सेलिब्रिटीजनंही हजेरी लावलीये. जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टींची उपस्थिती मुंबईमध्ये दहिहंडीची धुम सुरू आहे. मुंबईतील गोविंदांबरोबर याची सेलिब्रिटीही हंडीची मजा लुटताना दिसत आहेत. बोरिवलीच्या तारामती प्रतिष्ठानच्या दहिहंडीला अभिनेता जॅकी श्रॉफ आणि अभिनेत्री मानसी नाईक यांनी भेट दिली. यावेळी या दोघांनीही खूप धमाल केली. तर टेंभी नाका इथं आज बॉलिवूडचे अभिनेते सुनील शेट्टी उपस्थित होते. तसंच दादरच्या आयडीअलच्या दहीहंडी मंडळाच्या दहीहांडी उत्सवाला सेलिब्रिटींची उपस्थिती ही नेहमीच आकर्षणाचा विषय ठरतं. यंदाही दहीहंडीसाठी शूटींगमधून ब्रेक घेऊन अनेक मराठी सेलिब्रिटी इथं आलेत. मागाठाण्यात मोठी दहीहंडी मागाठाणे इथं शिवसेना आणि तारामती चॅरिटेबल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाही दहीहंडी उत्सव आयोजित केला गेलाय. आमदार प्रकाश सुर्वे आयोजित ही दहीहंडी उपनगरातील मोठी दहीहंडी मानली जाते. यावर्षी या दहिहंडीत पाण्याचा वापर नाही. यंदा दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचा मानस आमदार प्रकाश सुर्वे यांनी बोलून दाखवला. महिला गोविंदाही मागे नाही मुंबईच्या रस्त्यावर गोविंद पथकं दिसताहेत, त्यात महिला गोविंदाही मागे नाहीत. चेंबूरच्या अमर ज्योत पथकानं या महिला पथकानं 5 थरांची दहीहंडी फोडली. या साठी या महिलांनी पूर्ण 1 महिना सराव केला होता. हे पथक मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यातली हंडी फोडण्यासाठी जातात असं त्यांनी सांगितलं.

DAhi handi asneu

 बोल बजरंग बली की जय! असं म्हणत ढाक्कुमाक्कुमच्या तालावर ठेका धरण्याच्या प्रतीक्षेत असलेली मुंबईसह ठाण्यातील गोविंदा पथके आता थरांवर थर लावून हंड्या फोडण्यासाठी सज्ज झाली आहेत. काल शनिवारी मध्यरात्रीपासूनच, म्हणजेच कृष्णजन्मानंतर हंड्या फोडण्यास सुरुवात झाली.

मुंबईमध्ये काल रात्रीपासून दहिहंडीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. आज सकाळपासूनच मुंबईत अनेक ठिकाणी हंड्या लावलेल्या पहायला मिळतायेत. मुंबईत सकाळी लवकर हंडी फोडण्याचा मान जातो तो दादरच्या आयडियल गल्लीतल्या हंडीला. या ठिकाणच्या तीनही हंड्या दरवर्षी बाराच्या आधी फुटतात. घाटकोपरमधली राम कदम मित्रमंडळ यांची हंडीही सकाळीच फुटली. खासदार किरीट सोमय्या आणि आमदार राम कदम यांनी मिळून ही हंडी फोडली. राम कदम मित्रमंडळाने यावर्षी दहीहंडीच्या बक्षिसाची रक्कम ही दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना देण्याचा मानस केला आहे. हंडी फोडणार्‍या गोविंदांना फक्त दह्याची हंडी भेट म्हणून देण्यात येईल.

ठाण्यातही असंच काहीसं दृश्य पाहायला मिळालं. ठाण्यात काल शनिवारी रात्रीच खर्‍या अर्थाने दहीकाला उत्सवाला सुरवात झाली. ठाण्यातल्या जांभळीनाक्यावरच्या खासदार राजन विचारे यांनी आयोजित केलेल्या महादहीहंडी उत्सवाची सुरवात कॅन्सर पिडीत मुलांनी कॅन्सर मुक्तीचा संदेश देत हंडी फोडून केली. ठाण्यातल्या जांभळी नाक्यावर खासदार राजन विचारे यांच्या वतीने दरवर्षी महाहंडीचे आयोजन करण्यात आलंय. कॅन्सर पिडीत मुलांसाठी काम करणार्‍या 'उगम' या संस्थेच्या मुलांनी हंडी फोडून या उत्सवाला सुरवात केली. यंदाचं 'उगम' या संस्थेचं पाचवं वर्षं आहे. पण यंदा ठाण्यातील काही आयोजकांनी दहीकाला उत्सव रद्द करण्याचं जाहीर केलं आहे.

दरम्यान, आज दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असला तरी गोविंदा पथकांना अजूनही नियमावली मिळालेली नाही. त्यामुळे दहीहंडी फोडणारी गोविंदा पथकं संभ्रमात आहेत. पोलिसांनी गोविंदा पथकांना दिलेल्या पत्रकात 18 वर्षाखालच्या मुलांना सहभागी होता येणार नसल्याचं म्हटलं आहे. पण त्याच पत्रकात 12 ते 15 वर्ष वयाच्या मुलांना आपल्या पालकांचे संमती पत्र बरोबर ठेवावं लागणार असंही म्हटलं आहे. बाल हक्क आयोगाच्या आदेशाने 12 वर्षाखालच्या मुलांना भाग घेता येणार नसल्याचं नमुद केलं आहे. या सर्वांमुळे गोपाळकाला मंडळं संभ्रमात आहे. यंदा सर्वोच्च न्यायालयाने बालगोविंदांच्या वयोमर्यादा असली तरी उंचीवरती काहीचं मर्यादा ठेवलेली नाही. त्यामुळे यंदातरी उंच थरांची स्पर्धा रंगलेली पाहायला मिळणार आहे. ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई, मुंबई आणि उपनगरांतील प्रत्येक गल्लीत दहीकाला उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. गोविंदा पथकांची पहाटेपासून रात्रीपर्यंत किती दहीहंड्या फोडायच्या, कुठे भेट द्यायची, कुठे केवळ थर उभारून सलामी द्यायची, याची तयारी पूर्ण झाली आहे. दहीहंडीच्या टी-शर्ट्सचे वाटप, ट्रक-टेम्पोची गर्दी, गोविंदांचा नाश्ता-जेवणाची सोय या सगळ्याची व्यवस्था करण्यात गोविंदा पथकांची तारांबळ उडाली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Shri krishna janmashtami, गोविंदा, दहीहंडी

पुढील बातम्या